शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'मुबारक हो, बाप हुआ है!' Mahindra कडून नवीन एसयूव्हीचे नाव आणि फर्स्ट लुक रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 19:13 IST

Mahindra Scorpio N : महिंद्राच्या या नव्या एसयूव्हीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून इंटरनेट आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. आता कंपनीने एसयूव्हीचे नाव आणि फर्स्ट लुक रिलीज केला आहे. 

नवी दिल्ली : महिंद्रा अँड महिंद्राचे Big Daddy of SUVs कोण आहेत? हे आता माहीत झाले आहे. महिंद्राच्या या नव्या एसयूव्हीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून इंटरनेट आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. आता कंपनीने एसयूव्हीचे नाव आणि फर्स्ट लुक रिलीज केला आहे. 

महिंद्राची एसयूव्ही महिंद्रा स्कॉर्पिओ एन (Mahindra Scorpio N) या नावाने बाजारात येणार आहे. नवीन टीझर व्हिडिओमध्ये कंपनीने पहिल्यांदाच कारची संपूर्ण झलक दाखवली आहे. या महिंद्रा कारच्या जाहिरात बॉलीवूडचे बिगबी अमिताभ बच्चन (BigB Amitabh Bachchan) यांचा आवाज आहे. नवीन टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांना 'मुबारक हो, बाप हुआ है!' म्हणताना ऐकू शकता.

नवीन  Mahindra Scorpio N चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये (Mahindra Research Valley) तयार करण्यात आली आहे. तसेच, हे डिझाइन मुंबईतील महिंद्रा इंडिया डिझाइन स्टुडिओमध्ये ( Mahindra India Design Studio) करण्यात आले आहे. कंपनी 27 जून रोजी Mahindra Scorpio N लाँच करणार आहे. त्याच दिवशी कारची किंमत जाहीर होणार असल्याचे समजते.

नवीन Mahindra Scorpio N चे इंजिन आणि फीचर्सची माहिती अजून समोर आलेली नाही, पण नवीन व्हिडिओ सोबत कारचा लूक समोर आला आहे. यात नवीन एलईडी हेडलॅम्प, सी-आकाराचे एलईडी डीआरएल आणि एलईडी फॉग लॅम्प असतील. कारचा लूक अतिशय स्पोर्टी आहे, तर समोरच्या ग्रिलमुळे ते खूप बोल्ड आहे. Mahindra Scorpio N ही महिंद्राच्या नवीन लोगोसह येणारी दुसरी कार असेल. यापूर्वी, कंपनीने महिंद्रा XUV700 मध्ये आपला नवीन लोगो समोर आणला  होता.

अनेक फीचर्स पाहायला मिळतीलMahindra Scorpio N बाबत आणखी काही संकेत देखील समोर आले आहेत. जसे की कारची बॉडी लाइन कर्व्ही आहे. यात स्पोर्टी अलॉय व्हील्स आहेत, जे काहीसे XUV700 सारखे दिसतात. ही डी-सेगमेंटची कार आहे. त्यामुळे यामध्ये पॉवरफुल डिझेल इंजिन मिळू शकते. याचबरोबर, कारचा इनर स्पेस देखील वाढविण्यात आला आहे. यासोबतच अनेक फ्युचरिस्टिक फीचर्सही यात पाहायला मिळतील. याशिवाय, नवीन Mahindra Scorpio N मध्ये तुम्हाला सनरूफ, ऑटोमॅटिक ORVM, छतावरील साइड रेल्स आणि शार्क अँटेना यांसारखे फीचर्स पाहायला मिळतील. तसे, कारच्या मागील बाजूस ब्रेक लाईट दरवाजाच्या वर देण्यात आला आहे. तर टेल लाइट देखील सी-आकारात असतील.

टॅग्स :Mahindraमहिंद्राcarकार