शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! पेट्रोल पंपावर कसे फसवतात? कर्मचारी या गोष्टी हेरतात, तुमच्या चुका टाळा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 15:21 IST

Petrol Pump Fraud: प्रत्येक पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या पद्धतीने ठकविले जाते. यामुळे तुम्ही जेवढे सजग तेवढे कमीच पडणार आहे.

जर तुमच्याकडे दुचाकी, कार आहे तर तुम्हाला पेट्रोल पंपावर जावे लागेल. ज्या लोकांनी ईलेक्ट्रीक वाहने घेतलीत ते पेट्रोल पंप सोडून सर्व्हिस सेंटरची भेट घेत असतील. परंतु, जे लोक पेट्रोल पंपावर जातात ते सर्रास फसले जातात. कारण तेथील कर्मचारी तुमच्या बेसावध पणाचा पुरेपूर फायदा उचलतात आणि लुटायचा प्रयत्न करतात. यात तुमची चुकी की त्यांची याकडे न जाता तुम्ही त्यापासून कसे सावध होता येईल हे पहा...

प्रत्येक पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या पद्धतीने ठकविले जाते. यामुळे तुम्ही जेवढे सजग तेवढे कमीच पडणार आहे. परंतु तुम्ही सर्वात आधी जेव्हा पेट्रोल किंवा डिझेन भराल तेव्हा कारमध्ये बसून किंवा दुचाकीवर बसून गप्पा मारणे बंद करा. तुम्ही गप्पांत गुंग असला तर फसलात म्हणून समजा. 

दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही इंधन भरण्यासाठी सांगाल तेव्हा तो कर्मचारी मीटरवर झिरो करतोय का ते पहा. तुमच्या आधी अनेकदा जो भरून जातो तो ५०-१०० रुपयांचे इंधन भरून जातो. तुम्ही त्यापेक्षा जास्तीचे इंधन भरायला गेला की फिलर त्याच्यापुढील मीटर चालू करतो. त्यामुळे तुमचे नुकसान होते. पेट्रोल पंपावर नेहमी १ लीटर, २ लीटर असे पेट्रोल भरू नका. तसेच १००,२०० चे भरू नका. नेहमी विषम नंबरचा आकडा सांगा व भरा. यामुळे तुम्ही पेट्रोल पंपावरील युनिटमध्ये फ्रॉड करण्यासाठी लावलेल्या चिपपासून वाचू शकाल. 

शक्यतो तुम्ही नेहमीच्या किंवा ओळखीच्या पेट्रोल पंपावर इंधन भरा. दुसरीकडे भरण्याची वेळ आली तर सजग रहा आणि मायलेजमध्ये काय फरक पडतो ते देखील पहा. तुम्हाला दुसऱ्या पंपावर जास्त मायलेज मिळत असेल किंवा गाडीमध्ये चांगला फरक पडला असेल तर नेहमीच्या पंपावर काहीतरी गोलमाल आहे हे लक्षात घ्या. सर्वात महत्वाची म्हणजे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी इंधन भरायला सुरुवात करताना बोलत बसू नका. त्यामुळे तुम्ही गुंतले जाल आणि तो हात साफ करून जाईल. सावध तो सुखी. काही गोलमाल वाटल्यास किंवा घडल्यास तुम्ही पेट्रोल पंपावरील तक्रार वहीमध्ये तक्रार नोंदवू शकता. त्याची दखल कंपनीचा अधिकारी व्हिजिटला आला की घेतो आणि तुम्ही फोन नंबर दिला असेल तर फोनही करतो.  

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपfraudधोकेबाजीPetrolपेट्रोल