शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
5
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
6
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
7
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
8
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
9
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
11
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
12
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
13
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
14
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
15
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
16
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
17
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
18
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
19
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
20
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा

Renault Triber: 7 सीटर MPV वर मिळतोय भारी डिस्काऊंट; ग्रामीण भागांसाठीही कंपनीची जबरदस्त ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 18:51 IST

Renault Triber : ग्रामीण भागांसाठीही कंपनीनं आणली ऑफर. सरपंचांपासून ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत सर्वांना होणार फायदा

ठळक मुद्देग्रामीण भागांसाठीही कंपनीनं आणली ऑफर.सरपंचांपासून ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत सर्वांना होणार फायदा

भारतीय बाजारपेठेत स्पेशियस आणि मोठ्या कार्सची बरीच मागणी असते. सद्यस्थितीत भारतीय बाजारपेठेत अशा अनेक कार्स उपलब्ध आहेत. परंतु फ्रान्सची वाहन उत्पादक कंपनी Renault नं आपल्या 7 सीटर कार Triber वर मोठा डिस्काऊंट देण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यात कंपनी शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना या एमपीव्हीच्या खरेदीसाठी एक विशेष ऑफर देत आहे, ज्या अंतर्गत आपण मोठ्या प्रमाणात बचत करू शकता.नुकतीच कंपनीनं आपल्या Triber चं नवं फेसलिफ्ट मॉडेल बाजारात लाँच केलं होतं. नव्या अपडेट्स आल्यानंतर या कारची किंमतही वाढवण्यात आली होती. आकर्षक लूक आणि जबरदस्त इंजिन क्षमता असलेल्या या MPV ची किंमत 5.30 लाख रूपयांपासून 7.82 लाख रूपये (एक्स शोरूम दिल्ली) इतकी आहे. कंपनीनं या कारमध्ये तिसऱ्या रांगेत डिटॅचेबल सीटचा वापर केला आहे. ज्यात तुम्हाला गरज भासल्यास ती सीटही काढता येते. ही एमपीव्ही सिंगल पेट्रोल इंजिन आणि चार व्हेरिअंट्ससोबत बाजारात उपलब्ध आहे. कंपनीनं यात 1.0 लीटर क्षमतेचं 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 72hp ची पॉवर आणि 96Nm चा टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतं. मिळतात हे फीचर्सफीचर्सबद्दल सांगायचं झालं तर या MPV मध्ये प्रोजेक्टर हेडलँप, LED डे टाइम रनिंग लाईट्स, 8.0 इंचाचा ट्चस्क्रिन एन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे. ही सिस्टम अॅपल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटोद्वारे कनेक्ट केली जाऊ शकते. तसंच तिन्ही रो मध्ये एसी वेंट्स, कुल्ड सेंटर बॉक्स, किलेस एंट्री, पुश बटन स्टॉर्ट/स्टॉप, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD), रिव्हर्स पार्किंग सेन्सर, पॉवर विंडो आणि रियर वॉश वायपर सारखेही फीचर्स देण्यात आले आहेत. काय आहे ऑफर?कंपनी या कारच्या जुन्या आणि नव्या अशा दोन्ही मॉडेल्सवर ऑफर देत आहे. कंपनीच्या वेबसाईटवर दिेलेल्या माहितीनुसार नव्या कारवर 30000 रूपये तर जुन्या मॉडेलवर 55000 रूपयांपर्यंतची बचत करू शकता. यामध्ये मागील मॉडेलवर 25 हजारांचा तर नव्या मॉडेलवरील 15 हजारांचा डिस्काऊंटही सामील आहे. 

ग्रामीण भागांसाठी विशेष ऑफर या ऑफर्सशिवाय कंपनी काही व्हेरिअंट्सवर 20 हजारांपर्यंत एक्सचेंज बेनिफिट्स आणि 10 हजारांपर्यंत लॉयल्टी बोन देते. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठीही विशेष ऑफर्स देण्यात येत आहे. याअंतर्गता ग्राम पंचायतीचे सदस्य, सरपंच आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त 5 हजार रूपयांचा डिस्काऊंट देण्यात येत आहे. परंतु ग्रामीण भागात ऑफरदरम्यान कॉर्पोरेट डिस्काऊंट लागू होणार नाही. 

टॅग्स :Renaultरेनॉल्टcarकारMONEYपैसा