शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

Baleno CNG Launched: मारुतीच्या प्रिमिअम कारदेखील सीएनजीवर आल्या; बलेनो, XL6 CNG लाँच, मायलेजही भन्नाट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 14:33 IST

मारुतीने आज नेक्सा ब्रँडच्या दोन कार बलेनो सीएनजी आणि प्रीमियम MPV XL6 CNG व्हेरिंअंट लाँच केले आहे.

मारुती सुझुकीने सीएनजीच्या आपल्या ताफ्यात आज तगड्या गाड्या उतरविल्या आहेत. पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले असताना सीएनजी त्यातलेत्यात दिलासा देणारा आहे. अशावेळी मारुतीने ग्राहकांना आणखी दोन कारमध्ये सीएनजीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये बलेनो आणि एक्सएल ६ आहे. 

मारुतीने आज नेक्सा ब्रँडच्या दोन कार बलेनो सीएनजी आणि प्रीमियम MPV XL6 CNG व्हेरिंअंट लाँच केले आहे. Baleno CNG कारची सुरुवातीची किंमत 8.28 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर या कारचे झिटा (Zeta) व्हेरिअंट 9.21 लाख रुपयांना एक्सशोरुम मिळणार आहे. 

याचबरोबर XL6 सीएनजीचे झिटा व्हेरिअंट देखील लाँच करण्यात आले असून याची किंमत 12.24 लाख रुपये आहे. या तिन्ही व्हेरिअंटची किंमत पेट्रोल व्हेरिअंटपेक्षा ९५ हजार रुपयांनी जास्त आहे. बलेनो सीएनजीचे मायलेज 30.61 किमी/किलो तर XL6 CNG चे मायलेज 26.32 किमी/किलोपर्यंत मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

बलेनो आणि एक्सएल ६ मध्ये 7 इंचाची स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, व्हॉईस असिस्टंस, सुजुकी कनेक्ट व सीएनजीसाठी खास स्क्रीन देण्यात आली आहे. एक्सएल ६ मध्ये क्रूज कंट्रोल, ४ एअरबॅग देण्यात आल्या आहेत. मारुती लवकरच ब्रेझासुद्धा सीएनजीवर लाँच करणार आहे. बलेनो लाँच झाल्यावर आता टोयोटानेसुद्धा ग्लान्झा सीएनजीवर लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. 

ब्रेझा पेट्रोल मॅन्युअलची दिल्लीतील किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते. सीएनजीवर चालणाऱ्या व्हेरियंटची किंमत सुमारे ७५,००० रुपये जास्त असण्याची शक्यता आहे. म्हणजे Brezza CNG MT ची किंमत 8.74 लाख-13.05 लाख दरम्यान असू शकते.

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकी