बजाज या पुण्यात पसारा असलेल्या कंपनीने नुकतीच इलेक्ट्रीक स्कूटर चेतक लाँच केली आहे. या स्कूटरची किंमत 1 लाख रुपये आहे. मात्र, पल्सरही इलेक्ट्रीक मिळाली तर. ती ही एक लाखात. होय एका अवलियाने जुनी पल्सर इलेक्ट्रीकमध्ये बदलली आहे.
काही स्टार्टअपनी इलेक्ट्रीक बाईकही लाँच केली आहे. भारतात आधीच Ultraviolette F77 ही बाईक लाँच झालेली आहे. मात्र, अन्य कंपन्यांची बाईक अद्याप आलेली नाही. सारे इलेक्ट्रीक स्कूटरमध्येच लक्ष देत आहेत. मात्र, बेंगळुरूच्या एका तरुणाने त्याची 150 सीसीची पेट्रोल इंजिनवाली पल्सर इलेक्ट्रीक केली आहे. Barrel Electric या स्टार्टअप कंपनीने ही बाईक बनविली आहे. सध्या ही बाईक 90 किमी प्रती तासाच्या वेगाने धावू शकते. त्यांना ही बाईक तब्बल 300 किमीच्या वेगाने पळण्यासाठी सक्षम करायची आहे.
या पल्सरची इंधन टाकीच त्यांनी काढून टाकली आहे. यामुळे पाहताना ही बाईक काहीशी विचित्र वाटते. एका चार्जिंगमध्ये ही कार 80 किमी अंतर कापते. तर इकॉनॉमी मोडवर 100 किमी धावू शकते. ली आयनची बॅटरी एका चार्जिंगसाठी अडीच तासांचा वेळ घेते.