शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ऑटो इन्शुरन्स करणं 20 टक्क्यांपर्यंत महागणार?, नवीन व जुन्या वाहनधारकांना बसणार फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 13:45 IST

Auto insurance : थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स  (Third party motor insurance) 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याचा कंपन्यांचा मानस आहे.

नवी दिल्ली : आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price)  दिवसेंदिवस वाढत आहेत. यातच आता देशातील करोडो वाहनधारकांना महागाईचा आणखी एक फटका बसू शकतो. विमा कंपन्यांनी यावर्षी विम्याचा हप्ता वाढवण्याची (insurance premium hike) पूर्ण तयारी केली आहे. थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स  (Third party motor insurance) 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याचा कंपन्यांचा मानस आहे.

विमा कंपन्यांनी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे (Insurance and Regulatory Development Authority of India) पाठवलेल्या प्रस्तावात कोरोनामुळे कंपन्यांचे होत असलेले नुकसान पाहता थर्ड पार्टी इन्शुरन्स 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याची मंजुरी देण्याची मागणी केली आहे. कंपन्यांची ही मागणी मान्य झाल्यास त्याचा थेट परिणाम देशातील करोडो वाहनधारकांवर होणार आहे.

Zeebiz च्या रिपोर्टनुसार, भारतात जवळपास 25 सामान्य विमा कंपन्या आहेत. त्यांच्या प्रस्तावाला IRDA मान्यता देईल, अशी कंपन्यांना आशा आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे की, कोरोनामुळे खूप नुकसान होत आहे. हे पाहता थर्ड पार्टी इन्शुरन्सचा सध्याचा प्रीमियम चांगला नाही आहे. कंपन्यांचे नुकसान होत आहे. काही कंपन्यांची परिस्थिती अशी झाली आहे की, त्यांची करदान क्षमता  (solvency) त्यांच्या विहित मर्यादेच्या खाली गेली आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्स क्मेम सुद्धा वाढले आहेत. त्यामुळे कंपन्यांवरील दबावही वाढला आहे.

थर्ड पार्टी विमा बंधनकारक 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानंतर, नवीन दुचाकी खरेदी करताना 5 वर्षांचा थर्ड पार्टी विमा आणि चारचाकी वाहनांसाठी 3 वर्षांचा थर्ड पार्टी विमा घेणे बंधनकारक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act), कोणतेही वाहन जे रस्त्यावरून फिरते, त्याचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. विमा प्रीमियम IRDAI कडून निर्धारित केला जातो. प्रीमियम दरवर्षी बदलतो. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे त्यात कोणताही बदल झालेला नाही.

 

टॅग्स :Automobileवाहन