शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

सणांच्या काळातही वाहन उद्योगात मंदी कायम, सप्टेंबरमध्ये कारच्या विक्रीत घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 15:19 IST

गेल्या दोन महिन्यांपासून भारताची अर्थव्यवस्था सुस्तावलेली आहे.

नवी दिल्लीः गेल्या दोन महिन्यांपासून भारताची अर्थव्यवस्था सुस्तावलेली आहे. मोदी सरकार या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वारंवार प्रयत्नशील आहे. यासाठी केंद्र सरकारनं कॉर्पोरेट टॅक्सपासून अनेक करांमध्ये कपात करण्याचे निर्णय घेतले आहेत. परंतु सरकारच्या या प्रयत्नानंतरही वाहन उद्योग क्षेत्रात मंदी कायम आहे. वाहन निर्मात्यांची संघटना असलेल्या सियामनं, सप्टेंबरमध्ये कारच्या विक्रीत पुन्हा एकदा कपात झाल्याचं सांगितलं आहे. सियामच्या आकड्यांनुसार, प्रवासी वाहनांच्या विक्रीत 23.69 टक्क्यांची घट झाली आहे. तर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत 62.11 टक्के कपात नोंदवली गेली आहे.  काय सांगतात आकडेसियामच्या आकड्यांनुसार सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहनांच्या उत्पादनात जवळपास 19 टक्क्यांनी कपात आली आहे. तसेच घरगुती विक्रीतही 23.69 टक्के घट नोंदवली गेली आहे. सप्टेंबरमध्ये जवळपास 2,23,317 प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. तर 2,79,644 प्रवासी वाहनांचं उत्पादन झालं आहे. सप्टेंबरमध्ये प्रवासी गाड्यांचं उत्पादन 1,80,779 युनिट राहिलं आहे. तर याच अवधीमधील गेल्या वर्षी  2,33,351 गाड्यांचं उत्पादन झालं होतं. त्याअंदाजे 22.53 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे.

तसेच प्रवासी वाहनांच्या घरगुती विक्रीबाबत विचार केल्यास सप्टेंबर 2019मध्ये 1,31,281 गाड्यांची विक्री झाली आहे. तसेच गेल्या वर्षी याच कालावधीत 1,97,124 कारची विक्री झाली आहे. म्हणजेच प्रवासी गाड्यांच्या घरगुती विक्रीत 33 टक्के घट नोंदवली गेली आहे. यूटिलिटी वाहनांच्या सप्टेंबरमधील उत्पादनाचा विचार केल्यास 2.45 टक्क्यांची घट नोंदवून 87 हजार 127 झाली आहे. तसेच या अवधीमध्ये गेल्या वर्षी 89 हजार 319 वाहनांचं उत्पादन झालं आहे. 

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग