वाहन उद्योगातील मंदी पुढील वर्षी संपेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 05:09 AM2019-12-19T05:09:30+5:302019-12-19T05:09:35+5:30

टोयोटा किर्लोस्करच्या एन. राजा यांचे प्रतिपादन

The auto industry downturn will end next year | वाहन उद्योगातील मंदी पुढील वर्षी संपेल

वाहन उद्योगातील मंदी पुढील वर्षी संपेल

googlenewsNext

सोपान पांढरीपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१९ या वर्षात वाहन उद्योगाने गेल्या २० वर्षांतील सर्वात गंभीर मंदी पाहिली. जानेवारी ते नोंव्हेंबर या ११ महिन्यांत वाहनविक्री १५ टक्क्यांनी कमी झाली, पण स्थिती असून, २०२० मध्ये वाहन उद्योगातील मंदी संपेल, असे मत टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपव्यवस्थापकीय संचालक एन राजा यांनी व्यक्त केले.
लोकमतच्या मुलाखतील राजा म्हणाले की, अर्थव्यवस्थेतील मंदी बँका व गैरबँकिंग वित्तीय संस्थांनी वाहन कर्ज नाकारणे, जीएसटीबाबत अस्थिरता यामुळे वाहन उद्योगात मंदी तीव्र झाली, परंतु आता विक्री वाढत आहे. गेल्या वर्षी आम्ही १.४५ कार विकल्या होत्या. ती विक्री या वर्षी १.२० ते १.३० लाख झाली. पुढील वर्षी ती १.२० ते १.३० लाख होईल.
बंगळुरूजवळ टोयोटा किर्लोस्करचे दोन कारखाने असून, एका कारखान्याची क्षमता एक लाख वाहनांची आहे. तिथे इन्नोव्हा व फॉर्च्युनर मॉडेल्स तयार होतात. दुसऱ्या कारखान्याची क्षमता २.१० लाख वाहनांची आहे. तिथे लान्सर करोला, इटिओस, यारीस इत्यादी मॉडेल्स तयार होतात. याशिवाय जपानमधून पूर्णत: तयार अशा प्राडो लँडक्रूझर व लेक्सस ही मॉडेल्स आयात होतात, असे ते म्हणाले.
बॅटरीवर चालणाºया ई-कारबद्दल राजा म्हणाले टोयोटा जवळ हायड्रोजन हायब्रिड (पेट्रोल/डिझेल व गॅसवर चालणारी कार), फक्त बॅटरीवर चालणारी कार व फ्युएल सेलवर चालणारी कार अशी सर्व मॉडेल्स उपलब्ध आहेत. ती भारतातही येतील. टोयोटा आपल्या विक्रेत्यांना खूप मोठा साठा ठेवण्यासाठी बाध्य करत नाही. कंपनी सोबतच विक्रेत्याचीही आर्थिक उन्नती व्हावी असे टोयोटाचे धोरण आहे.

बॅटरी कारची घाई नाही
सरकारने २०३० पर्यंत देशात ३० टक्के वाहने बॅटरीवर चालविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तोपर्यंत त्या कार भारतात आणण्याची घाई नाही. आता भारतात कॅमरे हायब्रिड कार आणली आहे, असे सांगून राजा म्हणाले की, बॅटरीवर कार चार्ज व्हायला ६ ते ७ तास लागतात व फ्युएल सेलवर चालणारी कार १० ते १५ मिनिटांत चार्ज होते, परंतु दोन्ही तंत्रज्ञान महाग आहेत.

Web Title: The auto industry downturn will end next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.