शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एथरने किंमती १०,००० नी घटविल्याचे सांगितले, पण 'रंग' दाखविला; घोडे-भाडे तेच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:39 IST

Ather Rizta Discount: एथरने नुकतेच त्यांच्या स्कूटरच्या किंमती १० हजार रुपयांनी कमी करण्याचे जाहीर केले होते. परंतू, ते एक आमिष असल्याचे समोर येत आहे. 

- हेमंत बावकर

सध्या बाजारात इलेक्ट्रीक स्कूटरची चलती आहे. बजाज चेतक, ओला या कशाही असल्या तरी पहिल्या पाचात आहेत. टीव्हीएसच्या ईलेक्ट्रीक स्कूटरची तशी चर्चा नसली तरी या स्कूटरने दुसरा क्रमांक पटकावला आहे. ओला तिसऱ्या क्रमांकावर असून एथर ही कंपनी चौथ्या क्रमांकावर आहे. आता एथरने नुकतेच त्यांच्या स्कूटरच्या किंमती १० हजार रुपयांनी कमी करण्याचे जाहीर केले होते. परंतू, ते एक आमिष असल्याचे समोर येत आहे. 

एथरची रिझ्टा ही फॅमली स्कूटरची एक्स शोरुम किंमत कंपनीने गेल्याच आठवड्यात १.०९ लाखांवरून ९९ हजार रुपये केली आहे. परंतू, असे करताना कंपनीने २०२५ च्या स्कूटरवर कलरनुसार पैसे वाढविले आहेत. म्हणजे, एक-दोन महिन्यांपूर्वी ज्या ग्राहकांनी एथर रिझ्टा खरेदी केली, तेवढ्याच किंमतीला १० हजार रुपयांचा डिस्काऊंट असलेली स्कूटर मिळत आहे.

ओलाने काही महिन्यांपासून बॉस सेल जाहीर केला होता. कस्टमर तुटून पडले होते. पण तिथे गेल्यावर समजले बॉस सेलमध्ये स्कूटर कोणालाच मिळत नाहीय, आहे त्याच किंमतीला ती खरेदी करावी लागतेय. तसाच हा प्रकार आहे. एथरने एकडून तिकडून किंमत फिरवून तेवढीच ठेवली आहे. फक्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक्स शोरुमच्या किंमतीत बदल केला आहे. 

कलरसाठी पैसे मोजा...एथरने कलरसाठी पैसे मोजण्यास ग्राहकांना बांधिल केले आहे. मोनोटोन म्हणजेच एकच कलर असेल तर एवढे पैसे, ड्युअल टोन कलर हवा असेल तर त्यापेक्षा जास्त आणि मॅट निळा कलर हवा असेल तर त्यापेक्षा जास्त पैसे आकारले जात आहेत. २०२४ मध्ये कलरसाठी पैसे आकारले जात नव्हते. ते आता एक्स शोरुम किंमतीत कमी करून इकडून काढण्यात येत आहेत. तसेच प्रो पॅकमध्ये १००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर