शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आधीच मंदी, त्यात कर्मचाऱ्यांनी केली कामबंदी; Ashok Leyland अडकली कात्रीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 14:16 IST

अशोक लेलँड ट्रक, टेम्पो, बससारखी अवजड वाहने बनविते.

नवी दिल्ली : ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सध्या मंदीचे जोरदार वारे सुरू आहेत. गेल्या 20 वर्षांतील मोठी मंदी असल्याचे बोलले जात आहे. मारुती सुझुकीनेही खर्चात कपात करण्यासाठी तीन हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. टाटा मोटर्सनेही उत्पादनात कपात करण्यासाठी काही दिवस कंपनी बंद ठेवली होती. आता यानंतर आणखी एका भारतीय कंपनीचा नंबर लागला आहे. 

अशोक लेलँड ट्रक, टेम्पो, बससारखी अवजड वाहने बनविते. मात्र, मंदीचा फटका या क्षेत्रालाही बसला आहे. यामुळे कंपनीने कार्यकारी स्तरावरील कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यासाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे. कंपनीने ही योजना अशावेळी आणली आहे, जेव्हा मंदी आणि त्यांचे कर्मचारी बोनस वाढविण्यासाठी शुक्रवारपासून काम बंद आंदोलन करत आहेत. 

अशोक लेलँडच्या कर्मचारी संघटनेच्या सुत्रांनी सांगितले की, आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहे. मॅनेजमेंटने सोमवारपर्यंत कारखान्यात काम बंद केले आहे. कंपनीचे संचालक मंडळ आम्हाला जोपर्यंत आमच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. 

कंपनीच्या कामगार संघटनेने बोनसमध्ये 10 टक्क्यांची वाढ मागितली आहे. तर कंपनी 5 टक्के वाढ देण्यास तयार आहे. दरम्यान, हिंदूजा समुहाच्या या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी एक नोटीस जाहीर करत स्वेच्छा निवृत्तीची योजना किंवा ईएसएसची योजना दिली आहे. सुत्रांनुसार जे कर्मचारी व्हीआरएससाठी बसत नसतील तर त्यांच्यासाठी ही ईएसएस योजना आहे. 

ऑटो इंडस्ट्री मंदी आणि बीएस 6 च्या कचाट्यात सापडली आहे. पंतप्रधान मोदींनी नुकतेच या कंपन्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू ठेवल्याचे दिसत आहे. ऑटो सेक्टरने 2000 मध्ये यापेक्षा मोठ्या मंदीचा सामना केला होता. 

मारुतीचे अध्यक्ष भार्गव यांना मारुती सुझुकीने केलेल्या कामगार कपातीवर प्रश्न करण्यात आला होता. यावेळी त्यांनी होकार देत तीन हजार कर्मचाऱ्यांना कमी केल्याचे सांगितले. ऑटोमोबाईल सेक्टर अर्थव्यवस्थेमध्ये अनेक नोकऱ्या निर्माण करतो. विक्री, सेवा, इन्शुरन्स, लायसन्स, फायनान्स, अॅक्सेसरीज, ड्रायव्हर, पेट्रोल पंप आणि ट्रान्सपोर्टेशन यामध्ये मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या प्रभावित असणार आहेत. कल्पने पलिकडे या क्षेत्राला मोठा फटका बसणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. 

टॅग्स :MarutiमारुतीTataटाटाMaruti Suzukiमारुती सुझुकीNarendra Modiनरेंद्र मोदी