शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

आता अरब नाही, देशाचा शेतकरी वाहनांना देणार इंधन; नितीन गडकरींनी सांगितला पैसे वाचविण्याचा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 13:47 IST

Nitin Gadkari : पेट्रोलमुळे हवेचे प्रदूषणही जास्त होते. त्यामुळे इथेनॉलचा वापर करून प्रदूषण कमी करण्यासोबतच लोकांचे पैसे वाचवता येणार आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले.

नवी दिल्ली : आता लवकरच देशातील सर्व वाहने इथेनॉलवर (ethanol) धावू शकतील, त्यासाठी भविष्यात आणखी इथेनॉल पंप बसवण्यात येणार आहेत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले.  तसेच, बायो इथेनॉलपेक्षा पेट्रोलची किंमत जास्त आहे. पेट्रोलमुळे हवेचे प्रदूषणही जास्त होते. त्यामुळे इथेनॉलचा वापर करून प्रदूषण कमी करण्यासोबतच लोकांचे पैसे वाचवता येणार आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, ऑटो रिक्षापासून ते हाय-एंड कारपर्यंत सर्व वाहने इथेनॉलवर चालण्यात येतील. देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा नफा वाढवण्याबरोबरच इंधनाचा पुरवठा वाढविण्यासाठी पारंपरिक पिकांऐवजी इथेनॉल उत्पादनाकडे वळण्याची आज गरज असल्याचेही ते म्हणाले.

पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीवर देश दरवर्षी जवळपास 8 लाख कोटी रुपये खर्च करतो, यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भर दिला. तसेच, फ्लेक्स इंधन मोठ्या प्रमाणात वापरल्यास हा आकडा कमी होऊ शकतो. त्यामुळे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशात इथेनॉलचे उत्पादन वाढवावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

फ्लेक्स-इंधन इंजिन तयार करण्यास सुरुवात गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार निर्मात्यांना 6 महिन्यांत वाहनांमध्ये फ्लेक्सिबल-इंधन इंजिन असलेली वाहने बनवण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, केंद्र सरकार हरित आणि पर्यायी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे, ज्यामध्ये कंपन्यांनाही पुढे यावे लागेल. टीव्हीएस मोटर्स  (TVS motors) आणि बजाज ऑटो (Bajaj) सारख्या ऑटो कंपन्यांनी त्यांच्या चारचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी फ्लेक्स-इंधन इंजिन तयार करण्यास सुरुवात केली आहे.

काय आहे फ्लेक्स इंधन?फ्लेक्स-इंधन हे पर्यायी इंधन आहे, जे पेट्रोलमध्ये मिथेनॉल किंवा इथेनॉल मिसळून तयार केले जाते. फ्लेक्स-इंधनला त्याच्या जैवइंधनाच्या स्वरूपामुळे पेट्रोलपेक्षा कमी प्रदूषक असल्याचा दावा केला जातो. फ्लेक्स-इंधन इंजिन पेट्रोल आणि जैवइंधन या दोन्हीवरही चालू शकतात.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAutomobileवाहनPetrolपेट्रोल