शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
2
५ घटनांचा दाखला दिला, राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
3
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
4
रुबलच नाही तर चिनी चलन वापरून भारत करतंय तेल खरेदीचं पेमेंट; रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा
5
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
6
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
7
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
8
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
9
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?
10
'तो' एक सेकंद वाचवून गेला जीव! किरकोळ वाद झाला, पत्नी उडी मारणार तेवढ्यात पतीने हात पकडला
11
चीनने दुखती नस दाबताच अमेरिका नरमला! भारताकडे मागितली मदत; म्हणाले, आपण आता...
12
Diwali 2025: गोसेवा ही दत्त कृपेची गुरुकिल्ली? वसुबारसेच्या मुहूर्तावर जाणून घ्या 'हे' गुपित!
13
FASTag वार्षिक पास २ महिन्यांतच ठरला 'सुपरहिट'; २५ लाख युजर्सचा आकडा पार, किती झालं ट्रान्झॅक्शन?
14
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
15
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
16
वर्षाला व्याजच ५०० कोटी मिळेल, किंग खानला पान मसाल्याच्या जाहिरातीची वेळ का यावी? ध्रुव राठीचा सवाल
17
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
18
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
19
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
20
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल

‘या’ हेल्मेटमध्ये मिळतेय एअर बॅग, ॲक्सिडेंटच्या वेळी कारप्रमाणेच एअरबॅग उघडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 19:35 IST

आपल्या सुरक्षेसाठी कारमध्ये एअरबॅग्ज मिळतात याची तुम्हाला नक्कीच कल्पना असेल.

आपल्या सुरक्षेसाठी कारमध्ये एअरबॅग्ज मिळतात याची तुम्हाला नक्कीच कल्पना असेल. पूर्वी कारमध्ये एकच एअरबॅग मिळत होती. कालांतरानं दोन एअरबॅग्स कारमध्ये देण्यात येऊ लागल्या. त्याच वेळी, आता अनेक कंपन्यांनी 6 किंवा त्याहूनही अधिक एअरबॅग वापरण्यास सुरुवात केली आहे. एअरबॅगच्या मदतीने गाडीचा प्रवास सुरक्षित होतो. मात्र, दुचाकींचा विचार केला तर सुरक्षिततेची चिंता संपलेली नाही. दुचाकींच्या सीटवर एअरबॅग्ज बसविण्याबाबत संशोधन केले जात आहे. यासोबतच असे जॅकेटही तयार केले जात आहे जे अपघाताच्या वेळी एअरबॅगप्रमाणे तुमचे संरक्षण करेल. दरम्यान, आता हेल्मेटमध्ये एअरबॅग्ज बसवल्याची बातमी समोर आली आहे. इटालियन कंपनी एरोह अशा हेल्मेटसाठी तंत्रज्ञान तयार करत आहे. ते आल्यानंतर दुचाकी चालवणे अधिक सुरक्षित होईल.

एरोहने एअरहेड नावाचे नवीन हेल्मेट सादर केले आहे, ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे या हेल्मेटमध्ये अशा एअरबॅग्ज असतील जे गरजेच्या वेळी उघडतील आणि रायडरच्या डोक्याला खोल दुखापत होण्याची शक्यता कमी करेल. हेल्मेटचा बाहेरचा भाग अशा प्रकारे डिझाइन केलेला आहे की उघडल्यानंतरही डोके हलवायला भरपूर जागा असेल आणि रायडरला जास्त दबाव जाणवणार नाही. म्हणजेच अपघातानंतर तुमच्या डोक्याला किंवा चेहऱ्याला दुखापत होण्याची शक्यता नगण्य असेल. तथापि, या हेल्मेटच्या फीचर्स संबंधित जास्त माहिती किंवा त्याचं लाँच आणि किंमतीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. तथापि, काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की ते पुढील वर्षी लाँच केले जाऊ शकते.

भारतात BIS सर्टिफिकेशन हेलमेट आवश्यकमोटार वाहन कायद्यानुसार, मोटारसायकल किंवा स्कूटरवर हेल्मेट स्ट्रीप न घातल्यास 1000 रुपयांचा दंड घेतला जाऊ शकतो. त्याच वेळी, तुमच्या हेल्मेटला बीआयएस (ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) प्रमाणपत्र नसले किंवा सदोष असले तरीही 1000 रुपयांची पावती फाडली जाऊ शकते. अशाप्रकारे हा दंड 2 हजार रुपये होतो. या नवीन नियमामुळे हेल्मेट बनवणाऱ्या कंपन्यांना या मानकावर हेल्मेट तयार करावे लागणार आहे. या नियमानुसार हेल्मेटचे वजन १.२ किलो असावे. वाहतूक मंत्रालयानुसार नॉन आयएसआय मानक हेल्मेट विकणे हा गुन्हा आहे.

टॅग्स :Automobileवाहन