भारतीय वाहन बाजारात 'इंटरनेट इनसाइड' ही संकल्पना आणणाऱ्या आणि कुटुंबासाठी मोठी एसयूव्ही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमजी हेक्टरच्या सुधारित मॉडेलचे अनावरण आज, १५ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. २०१९ मध्ये भारतात पदार्पण केल्यानंतर हे हेक्टरचे दुसरे मोठे फेसलिफ्ट असणार आहे, ज्यामुळे कारच्या बाह्य आणि अंतर्गत रचनेत महत्त्वाचे बदल दिसणार आहेत.
नव्या एमजी हेक्टरमध्ये सर्वात मोठा बदल तिच्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. या अपडेटेड मॉडेलला क्रोम-गार्निशिंग असलेली एक नवीन आणि अधिक आकर्षक फ्रंट ग्रिल मिळणार आहे, जी सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक 'प्रिमियम' आणि आधुनिक लूक देईल. तसेच, नवीन डिझाईन केलेले स्किड प्लेट आणि ड्युअल-टोन अलॉय व्हील्स देखील यात दिसण्याची शक्यता आहे.
आतील भागाची रचना सध्याच्या मॉडेलप्रमाणेच राहणार असली तरी, एमजी कंपनी पोर्ट्रेट-ओरिएंटेड असलेल्या १४-इंचाच्या इन्फोटेनमेंट सिस्टीममध्ये काही नवीन फीचर्स समाविष्ट करण्याची शक्यता आहे. व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅनोरमिक सनरूफ , वायरलेस चार्जिंग आणि व्हॉईस असिस्टंटसारखे फीचर्स यात कायम राहतील.
इंजिन पॉवरमध्ये बदल नाही
२०२६ च्या हेक्टरमध्ये इंजिन आणि ट्रान्समिशनचे पर्याय सध्याच्या मॉडेलसारखेच कायम ठेवले जातील. यात १.५-लीटर टर्बो-पेट्रोल (१४३ एचपी) आणि २.०-लीटर टर्बो-डिझेल (१७० एचपी) या दोन्ही इंजिनचा पर्याय उपलब्ध असेल. या नव्या एमजी हेक्टरची अधिकृत विक्री जानेवारी २०२६ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. ही नवी एसयूव्ही ह्युंदाई क्रेटा, टाटा हॅरियर आणि महिंद्रा एक्सयूव्ही७०० सारख्या प्रमुख स्पर्धकांना तगडी टक्कर देईल.
Web Summary : MG Hector's updated model, featuring a redesigned front, 14-inch infotainment, and existing engine options, launches today. Sales expected January 2026.
Web Summary : एमजी हेक्टर का अपडेटेड मॉडल, जिसमें नया फ्रंट, 14 इंच का इंफोटेनमेंट सिस्टम और मौजूदा इंजन विकल्प हैं, आज लॉन्च हो रहा है। बिक्री जनवरी 2026 में शुरू होने की उम्मीद है।