शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, तुमचे वाहन भंगारात कधी काढणार?; ८ वर्षे जुन्या वाहनांची करावी लागणार फिटनेस टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 11:56 IST

फिटनेस सर्टिफिकेटचे नूतनीकरण न केल्याबद्दल मोठा दंड आकारला जाईल आणि अशा वाहनांना रस्त्यावर धावूदेखील दिले जाणार नाही.

मुंबई : केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार आठ वर्षे जुन्या व्यावसायिक वाहनांना दरवर्षी फिटनेस टेस्ट करणे बंधनकारक राहणार आहे. आठ वर्षे जुन्या बस किंवा ट्रकला दोन वर्षांतून एकदा ही टेस्ट करावी लागणार आहे. याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२३ पासून होणार असून २ फेब्रुवारी रोजी रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. 

फिटनेस सर्टिफिकेटचे नूतनीकरण न केल्याबद्दल मोठा दंड आकारला जाईल आणि अशा वाहनांना रस्त्यावर धावूदेखील दिले जाणार नाही. अशा वाहनांसाठी जास्त तेल लागते आणि ती पर्यावरणाला हानिकारक असतात. त्यामुळेही अपघात होतात. यावर अंकुश ठेवल्यास प्रवाशांची सुरक्षा वाढेल आणि पर्यावरण सुधारेल. दरम्यान, काही दिवसांपूर्वी १५ वर्षे जुनी व्यावसायिक  वाहने आणि २० वर्षे जुनी खासगी वाहने स्क्रॅप करण्याची पॉलिसी आधीच लागू करण्यात आली आहे. हा नवा नियम त्याच मार्गातील पुढचा टप्पा आहे. 

प्रदूषणाला आळाजुनी वाहने ही फिट वाहनांच्या तुलनेत १० ते १२ पट अधिक प्रदूषण करतात. त्यामुळे सध्या जगात प्रदूषण वाढत असताना किमान वाहनांमुळं होणारे प्रदूषण रोखण्यात आपल्याला काही प्रमाणात यश मिळेल. तसेच जुन्या वाहनांच्या तुलनेत नवीन वाहन मायलेज देखील उत्तम देतात. ज्यामुळे इंधनाची बचत होईल. स्क्रॅपिंग धोरण लागू केल्याने नवे रोजगार निर्माण होतील. १० हजार कोटींची गुंतवणूक करेल, ज्याद्वारे ५० हजार नोकऱ्या निर्माण होतील.

फिटनेस चाचणी बंधनकारक आठ  वर्षांखालील ट्रक किंवा बस इत्यादींना दर दोन वर्षांतून एकदा फिटनेस चाचणी करावी लागेल, तर आठ वर्षे किंवा त्याहून अधिक वर्षांच्या जुन्या व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस चाचणी बंधनकारक आहे. ही चाचणी ऑटोमेटेड फिटनेस स्टेशनवरच घेणे आवश्यक आहे. 

राज्यात जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी स्क्रॅप पॉलिसी केंद्र सरकारने धोरण ठरविले आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही धोरण ठरविले असून  जुने वाहन स्क्रॅप केले आणि नवीन वाहन घेतले तर त्यावर १० टक्के कर सवलत मिळणार आहे, तर १५ वर्षांनंतरची सरकारी वाहने स्क्रॅप करण्याची सुरुवात करण्यात आली आहे.  - विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त

टॅग्स :AutomobileवाहनRto officeआरटीओ ऑफीस