शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

6-7 सीटर सोडा! भारतातील 'या' आहेत 8 सीटर कार, पहिल्या कारची किंमत फक्त 13 लाख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 18:04 IST

8 seater cars : एमपीव्ही कारच्या यादीत इनोव्हा क्रिस्टा हे सर्वात लोकप्रिय नाव आहे. वर्षानुवर्षे ते ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे.

नवी दिल्ली : भारतीय ऑटो मार्केटमध्ये एसयूव्हीनंतर जर कोणत्या कारला मागणी असेल तर ती म्हणजे एमपीव्हीला आहे. तुमच्या मोठ्या कुटुंबाला लांबच्या सहलीवर घेऊन जाण्यासाठी असो किंवा व्यावसायिक वापरासाठी असो, एमपीव्ही कारमध्ये उपलब्ध असलेल्या जास्त सीट्स तुमचे काम सोपे करते. भारतात उपलब्ध असलेल्या 7 सीटर कारची मोठी लिस्ट आहे. पण, जर तुम्हाला 7 सीट्सही कमी वाटत असतील तर आम्ही तुमच्यासाठी 8 सीटर कारची लिस्ट घेऊन आलो आहोत. विशेष बाब म्हणजे, या लिस्टमधील पहिली कार फक्त 13 लाख रुपयांमध्ये मिळते.

1. Mahindra Marazzoमहिंद्रा कंपनीची ही एमपीव्ही विक्रीच्या बाबतीत आपली जादू दाखवू शकली नाही, परंतु सुविधांच्या बाबतीत ती कुणापेक्षा कमी नाही. या एमपीव्हीची किंमत 13.41 लाख रुपयांपासून सुरू होते. कारचा बेस M2 व्हेरिएंट तुम्हाला फक्त 8 सीट्सचा ऑप्शन ऑफर करते. कारला 1.5-लिटर डिझेल इंजिन (122PS आणि 300Nm) चा ऑप्शन देण्यात आला आहे, जो 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडला गेला आहे.

2. Toyota Innova Crystaएमपीव्ही कारच्या यादीत इनोव्हा क्रिस्टा हे सर्वात लोकप्रिय नाव आहे. वर्षानुवर्षे ते ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. या कारची किंमत 18.09 लाख रुपयांपासून सुरू होते. कारचे 8 सीटर व्हेरिएंट 18.14 लाख रुपये (एक्स-शोरूम) मध्ये मिळेल. ही कार 2.7-लीटर पेट्रोल इंजिन (166PS आणि 245Nm) सह येते.

3. Lexus LXया लिस्टमधील Lexus LX ही सर्वात महागडी कार आहे. कारची किंमत 2.63 कोटी रुपये आहे. अतिशय शक्तिशाली इंजिन आणि शक्तिशाली फीचर्ससह येणारी ही SUV 8 लोक बसू शकते. यात 5663 cc इंजिन आहे, जे 362 bhp आणि 530 Nm जनरेट करते. ही SUV 0-100kmph चा वेग 7.7 सेकंदात पकडते.

टॅग्स :Automobileवाहनcarकार