शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

दर महिन्याला ५००० रुपयांचा मेन्टेनन्स? त्रासलेल्या ग्राहकाने एथरची स्कूटर जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 15:49 IST

Ather Scooter Problem: चेन्नईच्या अंबत्तूरच्या पार्थसारथी नावाच्या ग्राहकाने एथरच्या शोरुमबाहेरच आपल्या स्कूटरला आग लावली आहे. स्कूटर सारखी सारखी बंद पडत असल्याने, मेंटेनन्स खूप देत असल्याने त्रस्त झाल्याने पार्थसारथीने कंटाळून हे पाऊल उचलले आहे. 

सध्या भारतीय बाजारात दुचाकींमध्ये चारच ईलेक्ट्रीक कंपन्यांची चलती आहे. ओला, बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब आणि एथर या चार कंपन्या बाजारात चांगल्या पाय रोवून आहेत. परंतू, या कंपन्यांच्या ग्राहकांना विविध समस्यांना समोरे जावे लागतच आहे. चेतकच्या स्कूटरमध्येही अनेकांना समस्या येत आहेत. एथरच्या ग्राहकांनाही येत आहेत. परंतू त्या ओलाएवढ्या जगजाहीर होत नाहीत. यामुळे अनेकांना या कंपन्यांच्या स्कूटर खूप चांगल्या आहेत असे वाटत आहे. ओलाची सर्व्हिस त्यातलेत्यात वाईटच आहे. परंतू, एथरचाही ग्राहक सर्व्हिसला वैतागलेला आहे. इलेक्ट्रीक गाड्यांच्याबाबत सर्व्हिसच महत्वाचा मुद्दा ठरलेला आहे. सोशल मीडियावर एथरच्या एका ग्राहकाची पोस्ट व्हायरल होत आहे. 

चेन्नईच्या अंबत्तूरच्या पार्थसारथी नावाच्या ग्राहकाने एथरच्या शोरुमबाहेरच आपल्या स्कूटरला आग लावली आहे. स्कूटर सारखी सारखी बंद पडत असल्याने, मेंटेनन्स खूप देत असल्याने त्रस्त झाल्याने पार्थसारथीने कंटाळून हे पाऊल उचलले आहे. 

अनुत्तरित तक्रारी आणि खराब सेवा यामुळे त्रासल्याचे या तरुणाने मीडियाला सांगितले आहे. शोरुमच्या कर्मचाऱ्यांनी त्याला हे करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न केला होता. १.८ लाख रुपये मोजून ही स्कूटर विकत घेतली, पहिल्याच महिन्यापासून या स्कूटरमध्ये समस्या येऊ लागल्या होत्या. दर ५ हजार किमीला मला बेअरिंग बदलायला सांगितले गेले. वारंवार दुरुस्तीसाठी ही स्कूटर सर्व्हिस सेंटरला न्यावी लागत होती. सुटे पार्ट नसल्याने सर्व्हिसला विलंब होत होता. नुकतेच मला स्कूटरचे ब्रेक पॅड, व्हील बेअरिंग आणि ड्राईव्ह बेल्ट बदलण्यास सांगण्यात आले, असा आरोप पार्थसारथीने केला आहे. 

सर्व्हिसिंग आणि स्पेअर पार्टवर माझे दर महिन्याला ५००० रुपये खर्च होत आहेत. हा खर्च आता मूळ स्कूटरच्या किंमतीपेक्षा जास्त झाला आहे. तीन वर्षे मी हे झेलत असल्याचा आरोप या ग्राहकाने केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार एथरच्या सूत्रांनी पार्थसारथीच्या दाव्यांचे खंडण केले आहे. तीन वर्षांत ग्राहकाला सर्व्हिससाठी १०००० रुपयेच खर्च आला आहे. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर