शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

'या' शानदार 350cc बाइकसमोर बुलेटही फेल! खरेदीसाठी मोठी गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 20:47 IST

रॉयल इनफिल्डची क्लासिक 350 (Royal Enfield classic 350) ही या सेगमेंटमधील आणि कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाइक आहे.

नवी दिल्ली : भारतीय ऑटो मार्केटमध्ये गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर 2022 मध्ये  350 सीसी बाइकच्या विक्रीत तब्बल 54.47 टक्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये टॉप 6 विकल्या गेलेल्या 350cc मॉडेल्सची एकूण विक्री 64,397 युनिट्स होती, जी नोव्हेंबर 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 41,688 युनिट्सपेक्षा 22,709 युनिट्स जास्त आहे. रॉयल एनफील्ड या सेगमेंटमध्ये सर्वात लोकप्रिय आहे आणि कंपनीची एक बाइक अशी आहे, ज्याची बुलेट देखील विक्रीच्या बाबतीत अपयशी ठरली आहे. दरम्यान, 350 सीसीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या टॉप 5 बाइक्सबद्दल जाणून घ्या...

रॉयल इनफिल्डची क्लासिक 350 (Royal Enfield classic 350) ही या सेगमेंटमधील आणि कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाइक आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये त्याची 26,702 युनिट्सची विक्री झाली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 19,601 युनिटच्या तुलनेत हे प्रमाण 36.23 टक्क्यांनी वाढले आहे.  एकूण 350cc बाइकच्या यादीत RE क्लासिक नवव्या स्थानावर आहे. 

नोव्हेंबरमध्ये 15,588 युनिट्ससह हंटर 350 (Hunter 350)ही या सेगमेंटमधील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी बाइक आहे. रॉयल इनफिल्डचे लोकप्रिय मॉडेल बुलेट 350 (Royal Enfield Bullet 350) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 8,211 युनिट्सची विक्री केली आहे. क्लासिक 350 शी तुलना केल्यास, बुलेट 350 च्या तुलनेत तिप्पट विक्री झाली आहे. 

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बुलेट 350 च्या 8,733 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच या बाइकच्या विक्रीत 6 टक्क्यांची घट झाली आहे. चौथ्या आणि पाचव्या स्थानाबद्दल बोलायचे तर, येथे मेटेओर 350 ( Meteor 350) आणि इलेक्ट्रा 350 (Electra 350) ने कब्जा केला आहे. या दोन्ही बाइक्सची अनुक्रमे 7,694 युनिट्स आणि 4,170  युनिट्सची विक्री झाली आहे. होंडाच्या CB 350 ने 350cc सेगमेंटमध्ये सहावे स्थान मिळवले, ज्याने नोव्हेंबर 2022 मध्ये 2,032 युनिट्सची विक्री केली.

टॅग्स :AutomobileवाहनRoyal Enfieldरॉयल एनफिल्ड