शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

भविष्यात 'या' तंत्रज्ञानावर चालणार वाहनं, मोठा बदल होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 15:08 IST

वाचा काय होणार बदल आणि काय म्हणाले नितीन गडकरी.

2030 पर्यंत, देशात विक्री केल्या जाणार्‍या नवीन वाहनांपैकी 30 टक्के इलेक्ट्रीक प्रवासी वाहने असतील. क्लेमेंट अँड एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधनात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर कौन्सिल (CEEW) च्या अहवालात असे म्हटले आहे की 2050 पर्यंत, विक्री होणाऱ्या एकूण वाहनांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांचा वाटा 75 टक्क्यांपर्यंत वाढेल. 2030 पर्यंत एकूण नवीन दुचाकींपैकी निम्म्या दुचाकी इलेक्ट्रीक दुचाकी असतील, असे या अभ्यासात म्हटले आहे. तसेच तीनचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये इलेक्ट्रीकचा वाटा 25 टक्के असेल.

१३ लाख इलेक्ट्रीक वाहनांची नोंदणीयाशिवाय, सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशात 13 लाखांहून अधिक इलेक्ट्रीक वाहनांची (ई-वाहने) नोंदणी झाली आहे. तर 2826 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन (PCS) कार्यरत आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

14 जुलै 2022 पर्यंत देशातील एकूण इलेक्ट्रीक वाहनांची संख्या 13,34,385 आहे आणि यामध्ये आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि लक्षद्वीपच्या आकडेवारीचा समावेश नाही, असे त्यांनी सांगितले. यासोबतच ते म्हणाले की, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (बीईई) नुसार देशात एकूण 2826 पीसीएस कार्यरत आहेत.

अवजड उद्योग मंत्रालयाच्या फेज-II (FAME इंडिया फेज-II) मध्ये इलेक्ट्रीक वाहनांचा जलद अवलंब आणि उत्पादन करण्याच्या योजनेंतर्गत, 68 शहरांमध्ये 2877 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन आणि 9 द्रुतगती मार्ग आणि 16 महामार्गांवर 1576 चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरNitin Gadkariनितीन गडकरीRajya Sabhaराज्यसभा