टीव्हीएस मोटर कंपनीने त्यांची नवीन दमदार आणि स्टायलिश लूकसह स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च केली आहे. या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत २.४० लाख रुपये आहे. अपाचे आरटीआर ३१० विशेषतः अशा तरुणांसाठी डिझाइन केलेली आहे, ज्यांना स्पोर्ट्स रायडिंग आवडते.
अपाचे आरटीआर ३१० मध्ये ३१२ सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे ३५.६ बीपीएच पॉवर आणि २८.८ एनएम टॉर्क जनरेट करते. शिवाय, या बाईकमध्ये स्लिपर क्लच आणि ड्रॅग टॉर्क कंट्रोल सारख्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला, ज्यामुळे सुरक्षित रायडिंगचा अनुभव मिळतो. ही बाईक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उत्तम आहे. स्पोर्टी लूकसह बाजारात दाखल झालेल्या या बाईकला मोठी पसंती मिळण्याची अपेक्षा आहे.
अपाचे आरटीआर ३१० तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली. या बाईकची सुरुवाती एक्स- शोरूम किंमतीत २.४० लाख रुपये आहे, ज्यात क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि रियर व्हील लिफ्ट मिटिगेशनसारखी फीचर्स मिळत आहेत. लाल आणि पिवळ्या रंगाची बाईक किंमत २.५७ लाख रुपये आहे.