जर्मनीची कार उत्पादक कंपनी फोक्सवॅगन (Volkswagen) आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही Volkswagen Taigun 23 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात लाँच करणार आहे. ही एसयुव्ही लाँच होण्यापूर्वीच या कारला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने 18 ऑगस्टपासून या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचं बुकिंग सुरू केलं होतं. परंतु आता carandbike च्या अहवालानुसार, Volkswagen Taigun चा 10 हजारांपेक्षाही प्री-ऑर्डर्स मिळाल्या आहेत.
Volkswagen ब्रांडचे बोर्ड मेंबर फॉर सेल्स, मार्केटिंग आणि आफ्टर सेल्स Klaus Zellmer यांनी याबाबत खुलासा केला. "भारतात दर महिन्याला Volkswagen Taigun च्या 5 ते 6 हजार युनिट्सची विक्री करण्याचं आमचं लक्ष्य आहे. परंतु आम्हाला लाँचपूर्वीच 10 हजार प्री बुकिंग्स मिळाल्या आहेत. Taigun ही Volkswagen समुहाचं पहिलं मॉडेल आहे जे India 2.0 स्ट्रॅटेजी अंतर्गत MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आलं आहे," अशी माहिती त्यांनी एका विशेष संभाषणादरम्यान दिली.
ही कार दोन प्रकारच्या इंजिन ऑप्शनसह येणार आहे. यामध्ये 1.0 लीटर TSI आणि 1.5 लीटर TSI पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल. 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड इंजन का आउटपुट 113 PS आणि 175 Nm इतकं आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसोबत येतं. 1.5 लीटर TSI पेट्रोल 148 bhp ची पॉवर आणि 250 Nm का टॉर्क जेनरेट करतं. या इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड डीएसजी ट्रांन्समिशनचा ऑप्शन मिळतो.