शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

उसैन बोल्टच्या कारकीर्दीची 'कांस्य'पदकाने सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 06:14 IST

जमैकाचा वेगवान धावपटू उसैन बोल्टने आपल्या कारकीर्दीची सांगता 'कांस्य'पदकाने केली. आतापर्यंतच्या कारकीर्दीत उसैन बोल्टला मिळालेले हे पहिले कांस्य पदक आहे, या आधीच्या प्रत्येक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्ण कमाई केली आहे. 

लंडन, दि.6 - जमैकाचा वेगवान धावपटू उसैन बोल्टने आपल्या कारकीर्दीची सांगता 'कांस्य'पदकाने केली. आतापर्यंतच्या कारकीर्दीत उसैन बोल्टला मिळालेले हे पहिले कांस्य पदक आहे, या आधीच्या प्रत्येक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्ण कमाई केली आहे. अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या कारकीर्दीतून निवृत्त होण्यापूर्वी सुवर्ण पटकावण्याचा निर्धार उसैन बोल्टने केला होता. मात्र, लंडन येथील विश्व अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीतील पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेच्या जस्टीन गॅटलिनने सुवर्ण पदाकावर कब्जा केला. त्यामळे उसैन बोल्टला कांस्य पदाकावर समाधान मानावे लागले. तर, अमेरिकेच्याच ख्रिस्तियान कोलमनने रौप्य पदक पटकावले.  100 मीटर धावण्याच्या शर्यतीत या अंतिम फेरीत जस्टीन गॅट्लीनने  9.92 सेंकद नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. ख्रिस्तियान कोलमनने  9.94 सेकंदाची वेळ नोंदवत दुसरा क्रमांक मिळवला. तर, उसैन बोल्टची 9.95 सेकंदाची वेळ नोंदवत तिस-या क्रमांक मिळवला. या शर्यतीत जरी उसैन बोल्टला सुवर्ण मिळाले नसले, तरी त्याच्या चाहत्यांनी मात्र तो मैदानातून बाहेर जाईपर्यंत त्याचा जयघोष सुरुच ठेवला होता.उसैन बोल्टने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये सहा सुवर्ण तर विश्व चॅम्पियनशिपमध्ये अकरा विजेतेपदांची कमाई केली आहे. 2012 च्या लंडन आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने तीन-तीन सुवर्णपदके कमावली आहेत. 9.58 सेकंदात 100 मीटर, तर 19.19 सेकंदात 200 मीटर अंतर धावून पार करण्याचा विश्वविक्रमही उसैन बोल्टने 2009 च्या बर्लिनमधील स्पर्धेत नोंदवला. याचबरोबर 2008 च्या ऑलिम्पिकमधील चार बाय 100 मीटर रिले शर्यतीत त्याचा सहकारी नेस्ता कॅन्टर हा उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे जमैकाला मिळालेले हे विजेतेपद काढून घेण्यात आले होते.