Tokyo Olympics: मराठमोळ्या अविनाश साबळेने ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रचला नवा विक्रम, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 10:43 AM2021-07-30T10:43:45+5:302021-07-30T10:44:51+5:30

Tokyo Olympics 2021: पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे. मात्र त्याला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही.

Tokyo Olympics: Avinash Sable sets new record for India in Olympics, but ... | Tokyo Olympics: मराठमोळ्या अविनाश साबळेने ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रचला नवा विक्रम, पण...

Tokyo Olympics: मराठमोळ्या अविनाश साबळेने ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रचला नवा विक्रम, पण...

googlenewsNext

टोकियो - जपानची राजधानी टोकियोमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील आजचा दिवस भारतासाठी संमिश्र यशाचा ठरत आहे. एकीकडे लवलिना हिने महिलांच्या बॉक्सिंच्या ६९ किलो वजनी गटात देशासाठी पदक निश्चित केले. दुसरीकडे दीपिका कुमारी हिने महिलांच्या तिरंदाजीमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तर पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला आहे. मात्र त्याला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. (Avinash Sable sets new record for India in Olympics)

अविनाशने यापूर्वी त्यानेच नोंदवलेला राष्ट्रीय विक्रम मोडत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. मात्र दुसऱ्या हीट रेसमधील आघाडीच्या तीन अॅथलिटपेक्षा अधिक चांगला वेळ नोंदवूनही त्याला अंतिम फेरीत प्रवेश मिळू शकला नाही. साबळेने दुसऱ्या हीटमध्ये ८:१८.१२ वेळ नोंदवली आणि मार्च महिन्यात फेडरेशन कपमध्ये नोंदवलेला आपलाच ८:२०.२० वेळेचा विक्रम मोडला. अविनाश साबळे दुसऱ्या हिटमध्ये सातव्या स्थानावर राहिला. प्रत्येक हीटमधून आघाडीचे तीन आणि सर्व हिटमधून आघाडीचे सहा धावपटू फायनलमध्ये पोहोचतात.

मात्र याबाबतीत साबळे दुर्दैवी ठरला कारण तिसऱ्या हीटमधील आघाडीचे तीन खेळाडू त्याच्यापेक्षा संथगतीने धावले होते. मात्र अखेरीस साबळे क्वालिफाईंग हीटमध्ये सातव्या आणि एकूण १३ व्या स्थानावर राहिला.  

Web Title: Tokyo Olympics: Avinash Sable sets new record for India in Olympics, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.