Tokyo Olympics: ...आणि ‘त्यांनी’ वाटून घेतले सुवर्णपदक, उंच उडीत बरोबरी झाल्यानंतर घेतला निर्णय़

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 08:00 AM2021-08-02T08:00:48+5:302021-08-02T08:01:35+5:30

Tokyo Olympics Updates:  कतारचा मुताज बार्शिम आणि इटलीच्या गिन्मार्को टम्बेरी या दोघांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये उंच उडीत २.३७ मीटरचे अंतर पार केले आणि दोघेही एकत्रच सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले.

Tokyo Olympics: ... and 'they' shared the gold medal, decided after equalizing in the high jump | Tokyo Olympics: ...आणि ‘त्यांनी’ वाटून घेतले सुवर्णपदक, उंच उडीत बरोबरी झाल्यानंतर घेतला निर्णय़

Tokyo Olympics: ...आणि ‘त्यांनी’ वाटून घेतले सुवर्णपदक, उंच उडीत बरोबरी झाल्यानंतर घेतला निर्णय़

googlenewsNext

टोकियो :  कतारचा मुताज बार्शिम आणि इटलीच्या गिन्मार्को टम्बेरी या दोघांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये उंच उडीत २.३७ मीटरचे अंतर पार केले आणि दोघेही एकत्रच सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. अंतर सारखे असल्याने या दोघांना पुन्हा उडी घ्यावी लागणार होती. मात्र त्यांनी ते नाकारले आणि सुवर्णपदक दोघांना मिळाले. 

बार्शिम याने लंडन २०१२ ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावले होते.  बार्शिम याने पहिल्या प्रयत्नात २.३५ मीटर उंच उडी घेतली होती. त्यानंतर त्याने आनंदातच इतर स्पर्धकांना देखील प्रोत्साहित करायला सुरुवात केली.  त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ब्रेंडन स्टार्क याने २.३५ मीटरचीच उडी घेतली. त्यानंतर बर्शिम याने २.३७ मीटरची उडी घेतली. आपणच विजेते असल्याच्या आनंदात तो होता.  त्याने इटलीच्या टम्बेरीला प्रोत्साहन देत आपली खिलाडूवृत्ती दाखवली. या प्रयत्नात मात्र टम्बेरी याने २.३७ मीटरचे अंतर कापले. त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारत सुवर्णपदक दोघांमध्ये वाटून घेतले. 

इटलीचा जेकब सर्वात जलद 
टोकियो : इटलीच्या लेमंट मार्सेल जेकब्सने १०० मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. त्याने रविवारी ऑलिम्पिक पुरुष १०० मीटरमध्ये ९.८ सेकंदांची वेळ नोंदवत विजय मिळवला. इटलीने पहिल्यांदाच धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. जेकब्सने अमेरिकेच्या फ्रेड कर्ले आणि कॅनडाच्या आंद्रे डिग्रासे यांना मागे टाकले. या स्पर्धेत उसेन बोल्ट याचा गेल्या १३ वर्षांपासून दबदबा होता.

Web Title: Tokyo Olympics: ... and 'they' shared the gold medal, decided after equalizing in the high jump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.