शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मीराबाई चानू, संजीता राष्ट्रकुल भारोत्तोलन स्पर्धेसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:34 IST

सेखोम मीराबाई चानू आणि संजीता चानू यांनी आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल सिनियर भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी आपापल्या गटात सुवर्ण पदके जिंकून पुढील वर्षी आयोजित राष्ट्रकुल

नवी दिल्ली : सेखोम मीराबाई चानू आणि संजीता चानू यांनी आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल सिनियर भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी आपापल्या गटात सुवर्ण पदके जिंकून पुढील वर्षी आयोजित राष्ट्रकुल  क्रीडा स्पर्धेची पात्रता मिळविली आहे.मीराबाईने स्रॅचमध्ये ८५ किलो तसेच क्लीन अ‍ॅन्ड जर्क प्रकारात १०४ किलो असे एकूण १८९ किलो वजन उचलून ४८ किलो वजन गटात सुवर्ण पदकाची कमाई केली. दरम्यान तिने स्रॅच प्रकारात नवा राष्ट्रकुल  विक्रम देखील नोंदविला. ८५ किलो वजन उचलताच तिने एक किलो अधिक वजन उचलण्यासह स्वत:चा आधीचा ८४ किलोचा विक्रम मोडीत काढला.संजीताने महिलांच्या ५३ किलो वजन गटात स्रॅचमध्ये ८५ तसेच क्लन अ‍ॅन्ड जर्कमध्ये ११० असे एकूण १९५किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजनदेखील पुढील वर्षी गोल्ड कोस्ट येथेच होणार आहे. एम. संतोषीने स्रॅच प्रकारात ८६ तसेच क्लीन अ‍ॅन्ड जर्कमध्ये १०८ असे एकूण १९४ किलो वजन उचलून दुसरे स्थान घेतले. पुरुषांच्या ५६ किलो वजन गटात गुरुराजा याने २४६ किलो(१०७ आणि १३९) वजन उचलून कांस्य पदक जिंकले.ज्युनियर गटात अनन्या पाटील आणि जेरेमी लालनिरुंगा यांनी भारतासाठी सुवर्ण पदके जिंकली. या दोघांनी युवा आणि ज्युनियर अशा दोन्ही गटात सुवर्णमय कामगिरी केली. अनन्याने ५३ किलो गटात एकूण १४६ किलो(६६ आणि ८० किलो) वजन उचलले. जेरेमीने पुरुष गटाच्या ५६ किलो वजन प्रकारात एकूण २४० किलो (१०९ तसेच १३१ किलो) वजन उचलण्याची कामगिरी केली. झिली दलाबेहडाने ४५ किलो महिला गटात एकूण १५४ किलो वजन उचलण्याची कामगिरी करीत सुवर्ण पटकविले.स्नेहा सोरेनने मुलींच्या ४८ किलो गटात १३८ किलो वजन उचलून अव्वल स्थान घेतले. जखुमा याने मुलांच्या ५६ किलो युवा गटात एकूण २१५ किलो वजन उचलण्याची किमया साधली पण त्याला रौप्यावर समाधान मानावे लागले.(वृत्तसंस्था)