शहरं
Join us  
Trending Stories
1
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
2
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
3
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
4
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
5
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
6
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
7
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
8
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
9
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
10
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
11
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
12
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
13
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
14
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
15
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
16
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
17
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
18
चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर
19
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
20
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मल्लाला २५ लाख रुपये नुकसानभरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:03 IST

मल्ल सतीशकुमार यांना बंदी असलेल्या पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी चुकीने २००२ मध्ये १४ व्या आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखण्यात आले होते.

नवी दिल्ली : मल्ल सतीशकुमार यांना बंदी असलेल्या पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी चुकीने २००२ मध्ये १४ व्या आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखण्यात आले होते. या प्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने मल्लाला २५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे.भारतीय कुस्ती महासंघाला (डब्ल्यूएफआय) नुकसानभरपाई देण्याचे निर्देश देताना न्यायालयाने खडे बोल सुनावले आहे. न्यायालयाने म्हटले आहे, की खेळाची माहिती नसलेल्या अधिकाºयाच्या नेतृत्वाखालील महासंघ खेळाडूंसोबत कसे वर्तन करतो, यावरून विश्वपातळीवर भारत पदक मिळवण्यात का संघर्ष करीत आहे, हे स्पष्ट होते.सीआयएसएफच्या कुमारने २००६ च्या मेलबोर्न राष्ट्रकुल व लॉस एंजिल्समध्ये विश्व पोलीस क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत देशाचे नाव उंचावले होते.डब्ल्यूएफआयला दोषी ठरविण्याव्यतिरिक्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुरिंदर एस. राठी यांनी केंद्रामध्ये सामील सर्व अधिकाºयांविरुद्ध चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. महासंघ व अधिकाºयांच्या निर्णयामुळे कुमारची कारकीर्द जवळजवळ संपुष्टात आली आहे. या अधिकाºयांमध्ये डब्ल्यूएफआयच्या अधिकाºयांचाही समावेश आहे. न्यायालयाने सरकारला निर्देश देताना अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होता कामा नये. कुमार यांना जो अपमान सहन करावा लागला, तसे भविष्यात कुणा खेळाडूसोबत घडायला नको. पंजाबमधील मल्ल कुमार यांची डब्ल्यूएफआयतर्फे दक्षिण कोरियातील बुसानमध्ये होणाºया १४ व्या आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली होती.पण, चुकीने त्याला अन्य खेळाडूंसह विमान प्रवासापासून रोखण्यात आले. कारण पश्चिम बंगालमधील हेच नाव असलेल्या एका मल्लाबाबत साशंकता निर्माण झाली होती.पश्चिम बंगालचा मल्ल त्या वेळी डोपमध्ये अडकल्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. (वृत्तसंस्था)