शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या अरपिंदर सिंगची ऐतिहासिक भरारी, काँटिनेंटल स्पर्धेत जिंकले कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 01:24 IST

आयएएएफच्या कॉंटिनेंटल कप स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनण्याचा मान अरपींदर सिंगने पटकावला आहे.

आॅस्ट्रावा (झेक प्रजासत्ताक) : भारताचा स्टार अ‍ॅथलिट अरपिंदर सिंग याने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करताना आयएएएफ कॉन्टिनेंटल चषक स्पर्धेत रविवारी तिहेरी उडीमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. विशेष म्हणजे या स्पर्धेत पदक जिंकणारा अरपिंदर पहिला भारतीय खेळाडू ठरला.नुकताच झालेल्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत अरपिंदरने आपल्या पहिल्याच प्रयत्नात १६.५९ मीटरची उडी घेतली. यानंतरच्या दोन प्रयत्नांमध्ये त्याला प्रत्येकी १६.३३ मीटर इतकीच झेप घेता आली. यामुळे त्याला दोन अ‍ॅथलिटच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यापासून मुकावे लागले. मात्र, असे असले तरी त्याने कांस्य पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वर्षातून एकदाच होणाऱ्या या प्रतिष्ठीत स्पर्धेमध्ये अरपिंदर आशिया पॅसिफिक संघाचे प्रतिनिधित्त्व करत होता. अरपिंदरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी १७.१७ मीटर अशी असून जकार्ता येथे आशियाई स्पर्धेत त्याने १६.७७ मीटरची उडी घेतली होती.स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकल्यास, आतापर्यंत कोणत्याही भारतीयाला या स्पर्धेत पदक मिळवणे शक्य झाले नव्हते. मात्र अरपिंदरने हे अपयश धुवून काढले. २०१० सालाच्या आधी या स्पर्धेकडे आयएएएफ विश्वचषक स्पर्धा असे ओळखले जात असे.दरम्यान, अरपिंदरने कांस्य पटकावले असले, तरी त्याला या स्पर्धेत तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागले. अमेरिकेचा विद्यमान आॅलिम्पिक आणि जागतिक विजेता ख्रिस्टियन टेलर याने १७.५९ मीटरची झेप घेत सुवर्ण पटकावले. त्याचवेळी, बुर्किन फासोच्या ह्यूज फॅब्राइज याने १७.०२ मीटरची उडी घेत रौप्य पटकावले. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Indiaभारतnewsबातम्या