शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मी टायमिंगसाठी धावते, पदकासाठी नव्हे; हिमा दासने व्यक्त केला आत्मविश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 03:57 IST

  ‘मी ट्रॅकवर उतरते तेव्हा माझे लक्ष पदक जिंकण्यावर नसते, तर टायमिंग सुधारण्यावर असते. टायमिंग सुधारले तर पदक आपोआप मिळेल. पदकासाठी स्वत:वर कधीही दडपण येऊ देत नाही.

नवी दिल्ली -  ‘मी ट्रॅकवर उतरते तेव्हा माझे लक्ष पदक जिंकण्यावर नसते, तर टायमिंग सुधारण्यावर असते. टायमिंग सुधारले तर पदक आपोआप मिळेल. पदकासाठी स्वत:वर कधीही दडपण येऊ देत नाही. आधीच्या कामगिरीत कशी सुधारणा होईल, हेच माझे उद्दिष्ट असते,’ असे, आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी १८ वर्षांची धावपटू हिमा दास हिने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले.फिनलँडच्या तम्पारे येथे २० वर्षांखालील विश्वचषकात ४०० मीटरचे सुवर्ण विजेती हिमा दास हिने जकार्ता येथे ४०० मीटर शर्यतीचे रौप्य पटकविलेच शिवाय महिलांच्या चार बाय ४०० मीटरचे सुवर्ण आणि ४०० मीटर मिश्र रिलेमध्ये सुवर्ण मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. हिमाला मंगळवारी अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, सहा महिन्याआधीपर्यंत ४०० मीटर शर्यत ही हिमाची मुख्य स्पर्धा नव्हती. ती म्हणाली, ‘मी टायमिंग सुधारण्यावर भर देते, पदक मिळविण्यावर नव्हे. ’हिमाने फिनलँडमध्ये ५१.४६ सेकंद वेळेसह ४०० मीटर शर्यत जिंकली होती. जकार्ता येथे तिने दोनदा राष्टÑीय विक्रम नोंदवला. तिने हिटमध्ये ५१.०० सेकंद वेळेसह १४ वर्षे जुना मनजीर कौरचा ५१.०५ सेकंदांचा विक्रम मोडला व नंतर मुख्य शर्यतीत ५०.७९ सेकंद वेळेसह स्वत:च्याच कामगिरीत सुधारणा केली. (वृत्तसंस्था)‘इतक्या लवकर अर्जुन पुरस्काराची आशा नव्हती’हिमा म्हणाली, ‘मला एका शर्यतीत रौप्य मिळाले तरी सर्वोत्कृष्ट प्रयत्न केल्याने निराशा झाली नाही. मी सहा महिन्यांपूर्वी ४०० मीटर धावणे सुरू केले. पण आधीपासून याचा प्रयत्न करीत होती. इतक्या लवकर अर्जुन पुरस्कार मिळण्याचा विश्वास नव्हता.’‘या पुरस्काराचा आनंद असून इतक्या कमी वयात हा पुरस्कार मिळाल्यामुळे माझ्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा देखील वाढल्या ओहत. त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल,’ असेही हिमाने यावेळी म्हटले.

टॅग्स :Hima Dasहिमा दासnewsबातम्या