शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

१६ लाख हेक्टर वनजमिनींचा हिशेब जुळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 16:54 IST

राज्याच्या वनविभागाने विविध उपक्रमांच्या नावावर वाटप केलेल्या वनजमिनींचे १ मार्च १८७९ पासून आजतागायत नोंदी ठेवल्या नाहीत.

 अमरावती - राज्याच्या वनविभागाने विविध उपक्रमांच्या नावावर वाटप केलेल्या वनजमिनींचे १ मार्च १८७९ पासून आजतागायत नोंदी ठेवल्या नाहीत. त्यामुळे महसूल विभागासह अन्य यंत्रणांच्या ताब्यात वनजमिनी असतानासुद्धा त्या परत करण्यास टाळाटाळ  केली जात आहे. सन १९४० ते आजतागायत १५ लाख ८६ हजार हेक्टर वाटपातील सर्व प्रकारच्या वनजमिनींचे हिशेब जुळत नाही. परिणामी अतिक्रमीत वनजमिनी परत घेताना शासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.        वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी वनजमिनींवरील अतिक्रमण काढणे, महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या वनजमिनी परत घेण्यासंदर्भात डिसेंबर २०१६ मध्ये शासनादेश काढला. दरम्यान प्रशासकीय स्तरावर वाटप वनजमिनी ताब्यात घेण्यासाठी बैठकांचे सत्र चालले. मात्र, आजही वनजमिनीबाबत स्थिती ‘जैसे थे’ आहे. सन १८६५ मध्ये भारतीय वन अधिनियम अस्तित्वात आला. त्यानंतर १८७८ मध्ये बदल होऊन राखीव व संरक्षित वने असे वर्गीकरण करण्यात आले. संरक्षित वने वा राखीव वनजमिनी या निर्वनीकरणाची तरतूद कायद्यात नसल्याने त्या वनजमिनींचा दर्जा सन १९२७ चा नवीन कायदा होईपर्यंत गोठविण्यात (केज) येत होता. त्यामुळे या वनजमिनींचा दर्जा वैधानिकरीत्या आजही वनजमीन असल्याने फॉरेस्ट कन्झरेवशन अ‍ॅक्ट १९८० कलम २ (अ) नुसार त्या वनजमिनींचा वनेत्तर कामी वापर केल्यास कायद्याचा भंग होतो. तसेच कलम २ (ड) नुसार त्या व वाटप केलेल्या, पंरतु आजपर्यंत निर्वनीकरण अथवा वन या व्याख्येतून वगळलेल्या नाहीत, अशा वनजमिनींवर व्यापारी, फळझाडे, औषधी वनस्पतीची लागवड केल्यास  वनसंवर्धन कायद्याचा भंग होतो. मात्र, ३८ वर्षांपासून वरिष्ठ वनाधिकारी ते उपवसंरक्षक श्रेणीतील अधिकाºयांनी भूमाफियांसाठी रान मोकळे केले आहे.

सन १९४० ते २०१८ कालावधीत वनजमिनी वाटपाचा लेखाजोखावर्ष     वाटपाचे प्रकार   लाभार्थी      क्षेत्रफळ (हेक्टरमध्ये)१९४०   दळी प्लॉट       ४८७२         १२, ९१९, ५४            कुमरी प्लॉट    ६३६            १, ७३४, ५४१९४५    प्लॉट वाटप     २६८१          २, ६८५, ८८१९६०     प्लॉट वाटप    ३५१६२        ५१, ७८२, ००१९६५    महसूल वर्ग                        १९, ५७७, ००१९७०   महसूलकडे वर्ग                   ५०, ०४०, ००१९७९   अतिक्रमित जमिनी                ९४, २१२, ५६२००२    सर्वोच्च न्यायालयात              शपथपत्र सादर                  ७८, ०००, ००२००५  वनहक्क कायद्यानुसार           वाटप क्षेत्र                           १२, २०, ०००, ००२०१८   वाटप वनजमिनी                   १,००, ०००, ००

एकूण वाटप वनजमिनी क्षेत्र              १६, ८३, ५६८, ९८ हेक्टर

प्रधान वनसचिवांच्या आदेशाप्रमाणे अन्य यंत्रणांच्या ताब्यात असलेल्या वनजमिनी परत घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. अतिक्रमित आणि महसूल विभागाच्या ताब्यातील जमिनी लवकरच परत घेतल्या जातील.         - उमेश अग्रवाल,           प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र

टॅग्स :forestजंगलnewsबातम्या