शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

अ‍ॅथ्लेटिक्समध्ये आणखी पदके जिंकण्याचे १०२ वर्षांच्या मन कौर यांचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 02:18 IST

भारताची १०२ वर्षांची महिला अ‍ॅथ्लिट मन कौर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला स्पेनमध्ये झालेल्या विश्व मास्टर्स ट्रॅक अँड फिल्डमध्ये सुवर्णपदकाचा मान मिळवला होता.

नवी दिल्ली - भारताची १०२ वर्षांची महिला अ‍ॅथ्लिट मन कौर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला स्पेनमध्ये झालेल्या विश्व मास्टर्स ट्रॅक अँड फिल्डमध्ये सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. कधीच पराभव न स्वीकारण्याच्या वृत्तीला जीवनाचे सार मानणाऱ्या या खेळाडूने पुढच्या स्पर्धेसाठी नव्या जोमाने सरावाला सुरुवात केली आहे.ती धावण्याव्यतिरिक्त भालाफेकही करते. पुढे होणाºया स्पर्धेत सहभाग नोंदवत पदक पटकाविण्यासाठी उत्सुक असल्याचे या खेळाडूने म्हटले आहे.मन कौर म्हणाल्या,‘मी आणखी पदके जिंकण्यास इच्छुक आहे. विजयानंतर मला आनंद मिळतो. सरकारतर्फे मला काही मिळाले नाही; पण ते महत्त्वाचे नाही, कारण माझी केवळ धावण्याची इच्छा आहे आणि त्यामुळे आनंद मिळतो.’मन कौरने या महिन्याच्या सुरुवातीला स्पेनमधील मलागामध्ये झालेल्या विश्व मास्टर्स अ‍ॅथ्लेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १०० ते १०४ या वयोगटात २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यांनी तेथे भालाफेक स्पर्धेतही सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या त्या एकमेव खेळाडू होत्या, पण चाहत्यांनी त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. त्यांनी वयाच्या १०२ व्या वर्षी २०० मीटर शर्यत पूर्ण केली आणि भालाफेकही केली. आता त्या पुढील वर्षी मार्चमध्ये पोलंडच्या यजमानपदाखाली होणाºया विश्व मास्टर्स अ‍ॅथ्लेटिक्स इन्डोरचॅम्पियनशिपसाठी सराव करीत आहे. त्यांचे लक्ष्य ६० मीटर व २०० मीटर शर्यतीत सहभागी होण्याचे आहे.त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी धावण्याच्या सरावाला सुरुवात केली आणि गेल्या वर्षी न्यूझीलंडच्या आॅकलंडमध्ये झालेल्या विश्व मास्टर्स स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत पदक पटकावल्यानंतर त्या प्रकाशझोतात आल्या. (वृत्तसंस्था)

टॅग्स :newsबातम्या