कन्या राशीच्या व्यक्तिंनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे. नियमित व्यायाम, योगा, प्राणायाम आणि सकाळी चालण्याची सवय आरोग्यासाठी उत्तम ठरेल. डोळे आणि त्वचा यांची अतिरिक्त काळजी घ्या. व्यवसायात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून मौल्यवान सल्ला किंवा टिप्स मिळू शकतात, ज्याचा फायदा होईल. नोकरीत सतर्क रहा, विरोधकांमुळे वरिष्ठांपर्यंत चुकीची माहिती जाऊ नये. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज उत्पन्न होऊ नयेत यासाठी शांततेने संवाद साधणे आवश्यक. वैवाहिक जीवनात स्थिरता राहील; मात्र घरातील एखादा सदस्य चुगली करू शकतो, त्यामुळे सतर्कता व सामंजस्य ठेवा. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात गुंतवणूक टाळणेच योग्य; चुकीच्या निर्णयामुळे नुकसान संभवते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा मेहनतीचा असून केलेल्या परिश्रमांचे फळ नक्की मिळेल. एकूणच, सावधपणे चालल्यास आठवडा स्थिर.