शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतीला किती मिळते मानधन?

By जितेंद्र दखने | Updated: July 21, 2023 19:24 IST

‘प्रशासकराज’मुळे झेडपी शिलेदारांच्या मानधनाचे ७१ लाख वाचले; निधी विकासकामावर खर्च

अमरावती : पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, असे समीकरण राजकारणाबाबत केले जाते. ते १०० टक्के खरे नाही आणि पूर्णतः खोटेही नाही. राजकारणात मान मिळतो, मात्र ‘अधिकृत' धनही मिळते? जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांना महिन्याकाठी मानधन, भत्ता, तर सदस्यांना सर्कलमध्ये दौऱ्यासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये खर्च दिला जातो. यासाठी झेडपीच्या बजेटमध्ये दरवर्षी तरतूद केली जाते; परंतु सध्या झेडपीत प्रशासकाच्या हातात कारभार आहे. त्यामुळे मिनी मंत्रालयाच्या पदाधिकारी यांच्या मानधन व भत्त्यावर होणाऱ्या लाखोंच्या खर्चाची बचत झाली आहे.

यापोटी वर्षभरात खर्च होणारा ७१ लाख ४१ हजारांच्या रकमेची बचत झाली आहे. त्यामुळे आता ही बचतीची रक्कम झेडपी प्रशासनाने विकासकामासाठी वळती केलेली आहे. यामुळे मानधन व भत्त्यावरील लाखोंचा खर्च आजघडीला शून्यावर आला आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही ग्रामीण भागाच्या विकासाची त्रिस्तरीय रचना आहे. ही व्यवस्था बहुतांश शासन निधीवर अवलंबून आहे. या संस्थेकडे स्वतःचा निधी आहे. या साऱ्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या पदाधिकाऱ्यांना विकासासाठी किती निधी द्यायचा, याचे प्रमाणही ठरलेले आहे. अर्थात, सत्ताधारी आणि पदाधिकारी थोडे अधिकचा हक्क सांगतात. विरोधकांना थोडी धावपळ करावी लागते. या पदाधिकाऱ्यांना दरमहा निश्चित मानधन मात्र ठरलेले आहे. जनतेच्या सेवेसाठी "जनसेवक' वेळ खर्च करतात, त्याचा मोबदला म्हणून हे मानधन दिले जाते. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात येऊन जवळपास दीड वर्ष होत आले आहे.

त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेचा संपूर्ण कारभार प्रशासक म्हणून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणात सुरू आहे. मात्र आता पदाधिकारीच नसल्याने यावर होणारा झेडपीचा ७१ लाख ४१ हजार रुपयाच्या खर्चाची वर्षभरात बचत झाली आहे. त्यामुळे हा निधी विविध विकासकामावर वळविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मानधन व भत्त्यावर होणारा लाखोंचा खर्च शून्यावर आला आहे.पदाधिकाऱ्यांना असे मिळते मानधनजि. प. अध्यक्ष : २० हजार रुपयेजि. प. उपाध्यक्ष : १५ हजार रुपयेजि. प. सभापती : १२ हजार रुपयेजि. प. सदस्य सर्कल दौरा : तीन हजार रुपयेपं. स. सभापती : १० हजार रुपयेपं. स. उपसभापती ८ हजार रुपये

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदzpजिल्हा परिषदAmravatiअमरावती