शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदांचा ई-क्लास जमिनी बेवारस, हर्रासमध्ये कोट्यवधीची ‘फिक्सिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 17:20 IST

राज्यात ३४ जिल्हा परिषदांच्या हक्काच्या ई-क्लास जमिनींवर आजही महसूल विभागाचा ताबा आहे. या जमिनींचा परस्पर वापर, विल्हेवाट होत असताना जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष चालविले आहे.

अमरावती : राज्यात ३४ जिल्हा परिषदांच्या हक्काच्या ई-क्लास जमिनींवर आजही महसूल विभागाचा ताबा आहे. या जमिनींचा परस्पर वापर, विल्हेवाट होत असताना जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष चालविले आहे. ई-क्लास जमिनींबाबत ही बाब लोकल आॅडिट फंडने विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या निदर्शनास आणून दिली नाही, हे विशेष.    राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने २५ मार्च २०१३ रोजीच्या शासन आदेशानुसार कायद्यातील तरतुदींच्या अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम २८८ मधील नमूद ११ व्या अनुसूचीत असलेल्या तरतुदीनुसार कोणत्याही स्थानिक क्षेत्रासंबंधी विद्यमान मंडळ म्हणजे मुंबई स्थानिक मंडळ अधिनियम १९२३ नुसार स्थापन करण्यात आले आहे. जिल्हा स्थानिक मंडळ किंवा मध्य प्रांत आणि वºहाड स्थानिक शासन अधिनियम १९४८ अंतर्गत रचना करण्यात आलेली आहे. जनपद सभा किंवा यथास्थिती हैद्राबाद जिल्हा मंडळ अधिनियम १९५५ नुसार स्थापन असलेले मंडळ यासह कोणत्याही स्थानिक क्षेत्रासाठी उत्तराधिकारी म्हणून जिल्हा परिषद असेल, असे स्पष्ट करण्यात आले. या नियमावलीनुसार ई-क्लास जमिनी जिल्हा परिषद मालकीच्या असल्याने महसूल विभागाकडे असलेल्या मालमत्ता जिल्हा परिषदांच्या नावे करण्याचे शासनादेश आहे. ही कार्यवाही जि.प. शिक्षण विभागाने करावी, असे ग्रामविकास मंत्रालयाने स्पष्ट केले. मात्र, २०१३ पासून जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यपालन अधिकारी, अध्यक्ष वा अन्य पदाधिकाºयांनी ही कार्यवाही केलेली नाही, हे वास्तव आहे. ई-क्लास जमिनींवर आजही महसूल विभागाचा ताबा आहे. ई-क्लास जमिनींबाबतचे लेखे तपासणी करण्याचे सौजन्यदेखील लोकल आॅडिट फंडने घेतले नाही. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांच्या मालकीच्या ई-क्लास जमिनी किती, हे राज्य विधिमंडळाच्या पंचायत राज समितीला कळू शकले नाही.  हर्रासमध्ये अनियमितता   जिल्हा परिषदेकडे थोड्याफार शिल्लक असलेल्या ई-क्लास जमिनी लागवडीकरिता वर्षाकाठी देताना बाजारमूल्यानुसार हर्रास करणे आवश्यक आहे. मात्र, शिक्षण विभागामार्फत बाजारमूल्य तपासले जात नाही. एकट्या अमरावती जिल्हा परिषदेत सन २०१३-२०१४ यावर्षी १२ पंचायत समित्यांमध्ये ५१६ पैकी २७५ ई-क्लास जमिनींच्या हर्रासातून ६ कोटी १५ लाख ८ हजार रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, तिजोरीत ५२ लाख रुपयांचे उत्पन्न जमा झाले. जिल्ह्यात १२ हजार ३१६ एकर ई-क्लास जमीन असल्याची नोंद आहे. 

ई-वर्ग जमिनींचे मूळ मालक हे शासनच असते. ई-वर्ग जमिनींच्या ताब्याची नोंद घेण्याची जबाबदारी तलाठ्यांची आहे. परंतु, त्या जमिनींवर ताबा कुणाचा असावा, यासाठी शासननिर्णय आहे. आतापर्यंत याबाबत कार्यवाही झाली नाही. लवकरच ई-वर्ग जमिनींची नोंद करून त्या ताब्यात घेतल्या जातील.  - किरण कुलकर्णी, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती

टॅग्स :zpजिल्हा परिषदAmravatiअमरावती