शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शिक्षकांची ‘जात’ चौकशीच्या टप्प्यात! उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, बिंदू नामावली रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 16:30 IST

राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या जाती बदलल्याचे निरीक्षण नोंदवून त्यातील घोळ शोधून काढण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. यात विदर्भातील यवतमाळसह नांदेड, परभणी, औरंगाबाद, सोलापूर, बीड, अहमदनगर, सातारा आणि कोल्हापूर या अन्य जिल्हा परिषदांचा समावेश आहे.

- प्रदीप भाकरे

अमरावती : राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या जाती बदलल्याचे निरीक्षण नोंदवून त्यातील घोळ शोधून काढण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. यात विदर्भातील यवतमाळसह नांदेड, परभणी, औरंगाबाद, सोलापूर, बीड, अहमदनगर, सातारा आणि कोल्हापूर या अन्य जिल्हा परिषदांचा समावेश आहे.या जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बिंदुनामावलीची (रोस्टर) चौकशी करण्यासाठी पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्तांच्या (आस्थापना) अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली आहे. २९ नोव्हेंबरला गठित केलेल्या समितीत यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी, औरंगाबाद, सोलापूर, बीड, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर या जिल्हा परिषदांमधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि समाजकल्याण अधिकारी समिती सदस्य असणार आहेत. या समितीला १५ दिवसांमध्ये बिंदू नामावलीतील अनियमिततेचा अहवाल शासनास द्यायचा आहे.जुन्या बिंदू नामावलीमध्ये मागासवर्गीय प्रवर्गात दर्शविण्यात आलेल्या उमेदवारांना नवीन बिंदुनामावलीत खुल्या प्रवर्गातील बिंदूवर दर्शविण्यात आले आहे. त्याची चौकशी या समितीला करायची आहे. सीईटी २०१० मध्ये मागासवर्गीय प्रवर्गात निवड झालेल्या उमेदवारांना २०१७ मध्ये बिंदू नामावली अद्ययावत करताना खुल्या प्रवर्गातील बिंदूवर दर्शविण्यात आले. याशिवाय काही कर्मचाºयांची माहिती सापडत नाही, असा शेरा मारून त्यांना खुल्या प्रवर्गात टाकण्यात आले. सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाºयांची नावेही बिंदू नामावलीत आढळून आलीत. या संपूर्ण अनियमिततेची चौकशी केली जाणार आहे. वस्तीशाळा विम शिक्षकांना प्राथमिक शिक्षण पदावर सामावून घेताना त्यांच्या रिक्त असलेल्या प्रवर्गात सामावून न घेता त्यांना जून २०१७ च्या बिंदू नामावलीमध्ये खुल्या बिंदूवर दर्शविण्यात आले. याशिवाय काही जिल्हा परिषदांमध्ये कर्मचा-यांची जात बदललेली असणे, या मुद्याचीही चार सदस्यीय समितीला चौकशी करावयाची आहे. शिक्षण विभागाने बिंदूनामावलीत घातलेला घोळ आणि त्यातून निर्माण झालेले आरक्षणाची समस्या चौकशी समिती कशी सोडवेल, याकडे शिक्षण वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाने आरक्षित बिंदूबाबत चौकशी केली आहे. त्यामुळे या समितीने प्रामुख्याने खुल्या प्रवर्गातील बिंदूवर दर्शविण्यात आलेल्या पदाबाबत चौकशी करावी, अशी सूचना कक्ष अधिकाºयांनी केली आहे. 

चार विभागीय आयुक्तांना पत्रदहा जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बिंदुनामावलीची चौकशी करण्याकरिता उपायुक्त (आस्थापना) यांचे अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली. त्या अनुषंगाने या समितीकडून १५ दिवसांत अहवाल घेवून तो शासनास पाठवावा, असे पत्र कक्ष अधिकारी हे.सु. पाठक यांनी पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती विभागीय आयुक्तांना पाठविले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा