शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
2
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
3
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
4
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
5
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
6
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
7
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
8
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
9
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
10
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
11
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
12
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
13
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
14
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
15
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
16
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
17
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
18
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
19
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

जिल्हा परिषद आवारात सुरक्षा होणार भक्कम

By admin | Updated: July 21, 2015 00:28 IST

स्थानिक जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे.

प्रशासन : सीईओ करणार उपाययोजना, चोरट्या मार्गावर राहणार रक्षकांची नजरअमरावती : स्थानिक जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे. मोटारसायकल चोरीसह सायकलचोरीच्या घटना वाढू लागल्याने नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी सुरक्षेबाबत विशेष उपाययोजना आखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रामुख्याने वाहनांना बंदिस्त पार्किंग करण्याबरोबरच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहे. मिनीमंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत चोरट्यांचा अनेक दिवसांपासून सुळसुळाट झाला आहे. भंगार साहित्यासह उभ्या असलेल्या वाहनांच्या साहित्याचीही चोऱ्या झालेल्या आहेत. यासोबत कार्यालयातील संगणक चोरीच्या घटना घडल्या आहेत. अशातच जिल्हा परिषदेत कामासाठी येणाऱ्या नागरिकांची आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मोटार सायकली जिल्हा परिषद आवारात उभ्या केल्या जातात. मात्र मिनी मंत्रालयाचा परिसरातून दुचाकी वाहने चोरुन नेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारांवर आळा बसावा म्हणून लवकरच जिल्हा परिषदेच्या आवारात सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. सोबत सर्व बाजुंनी चोरट्यांचा या प्रकारावर कडक नजर सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून ठेवण्याचा निर्णय सीीओ सुनील पाटील यांनी घेतला आहे. त्यांनी पदभार स्वीकारुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. अशातच आठ ते पंधरा दिवसातच आवारातून मोटारसायकल लंपास केली आहे. या घटनेने जिल्हा परिषदेत चोरटे सक्रिय असल्याचे सिद्ध होते. या घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनांची दखल घेत नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुरक्षेवर विशेष खबरदारी घेतलेल आहे. त्यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेत असलेली असुरक्षित व अस्ताव्यस्त पार्किंगला शिस्त लावण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात काही वर्षापूर्वी साकारण्यात आलेल्या सभापतीच्या दालनासमोर बांधकाम विभागसमोर आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. या बाबींवरही देणार सुरक्षेसाठी लक्षजिल्हा परिषदेत अनेक जण विनाकारण भटकंती करीत असतात. यावर पर्याय म्हणून सर्व छुपे रस्ते बंद करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, सीसीटीव्ही कॅमेरे, चहूबाजुंनी व मुख्य बाजूला लावले जाणार आहेत. जिल्हा परिषदेत दोन्ही गेटपैकी एका गेटने दुचाकींना येण्यासाठी व जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या सुरक्षा व स्वच्छता गृहाच्या स्वच्छतेसाठी संबंधीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यासाठी पार्किंगची सुविधा करण्यात येईल. दरम्यान याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल. -सुनील पाटील, सीईओ, जि.प.