शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्याचा टाईमटेबल ठरला

By जितेंद्र दखने | Updated: November 9, 2024 21:23 IST

३१ मेपर्यंत राज्यातील शिक्षकांची बदली प्रक्रिया होणार पूर्ण

अमरावती : जिल्हा परिषद शिक्षकांच्या दरवर्षी लांबणाऱ्या बदल्यांचे ससेमिरा आता कायमचा बंद होणार आहेत.त्यानुसार पुढे एकाच वेळापत्रकानुसार अमरावतीसह राज्यभरातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याची प्रक्रिया  ही ३१ मे पर्यत  पूर्ण केली जाणार  आहे. शिक्षक बदल्याबाबतचे वेळापत्रक   ७ नोव्हेंबर शासनाकडून जारी केले आहे. 

जिल्हा  परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण १८ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार निश्चित  केले आहे. त्यानुसार तसेच यापूर्वी  शासनाने वेळोवेळी तयार केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलव्दारे राबविण्यात येते.परंतु, नागपूर उच्च न्यायालयात दाखल अवमान याचिकेवरील २५ ऑक्टोबरच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाइन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रियेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसारच कार्यान्वित असावे असे निर्देश दिलेले आहेत.त्यानुसार यापुढे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारण संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन शाळांमधील  शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर,संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची  पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरू करावी,तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिध्द करण्याची कार्यवाही करावी,त्यानंतर दरवर्षीच्या  वेळापत्रकानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात यावी, वेळापत्रक सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्याची जबाबदारी  संबंधित झेडपी सीईओंवर राहणार आहे. संबंधित वेळापत्रकानुसार पोर्टल व्यवस्थितरीत्या सुरू ठेवण्याची जबाबदारी मे. विन्सीस आयटी प्रा. लि. पुणे या कंपनीची राहणार आहे. एखाद्या वर्षी काही अपरिहार्य कारणास्तव बदली प्रक्रिया राबविणे शक्य नसल्यास व तसे शासनाने स्वतंत्रपणे कळविल्यास त्या विशिष्ट वर्षासाठी संबंधित वेळापत्रक लागू राहणार नाही. तसेच एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात यावी, असे देखील नमूद केले आहे. असे आहे वेळापत्रक१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे,उपलब्ध रिक्त जागा निश्चित करणे १ ते ३१ मार्च,बदलीसाठी आवश्यक सर्व डेटा झेडपीने संबंधित कंपनीस उपलब्ध करून देणे १ ते २० एप्रिल,समानिकरणांतर्गत रिक्त पदे निश्चित करणे २१ ते २७ एप्रिल,विशेष संवर्ग शिक्षक भाग १ मधी रिक्त जागा घोषित करणे २८ एप्रिल ते ३ मे,विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांच्या रिक्त जागा घोषित करणे ४ ते ९ मे,बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे १० ते १५ मे,बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्यासाठी रिक्त जागा घोषित करणे १६ ते २१ मे,विस्थापीत शिक्षकांसाठी बदल्यासाठी रिक्त जागा घोषित करणे २२ ते २७ मे आणि अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे २८ ते ३१ मे

टॅग्स :Teacherशिक्षक