शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

युवा स्वाभिमानी संघटनेची अमरावतीत खासगी फायनान्सच्या कार्यालयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 21:53 IST

युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंत टॉकीजनजीकच्या एका खासगी फायनान्सच्या कार्यालयात बुधवारी दुपारी १ वाजता आंदोलन केले. तेथील साहित्याची तोडफोड केली. कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीनागरिकांना उर्मट वागणूक मिळत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खासगी फायनान्स कंपनीचे अधिकारी कर्मचारी नागरिकांना विनाकारण त्रास देत असून, अवैधरीत्या पठाणी वसूली करीत आहे. वस्तू फायन्स केल्यानंतर कोरोनाची साथ असतानाही अवाजवी व्याज आकारून ते वसुली करण्याकरिता नागरिकांना रात्री-बेरात्री फोन करून धमकावितात. या कारणावरून संतापलेल्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंत टॉकीजनजीकच्या एका खासगी फायनान्सच्या कार्यालयात बुधवारी दुपारी १ वाजता आंदोलन केले. तेथील साहित्याची तोडफोड केली. कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. तीन कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावून शाखा व्यवस्थापकाला कार्यालयात डांबले.लॉकडाऊनच्या काळात आधीच नागरिक त्रस्त झाले असताना ज्या नागरिकांनीत् या कंपनीकडून वस्तू फायन्सवर खरेदी केल्या आहेत. त्या नागरिकांना त्रास देणे सुरू असून, पठाणी वसुली बंद करा, यासंदभार्चा जाब विचारण्याकरिता कार्यकर्ते कार्यालयात पोहचले असता, येथील शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. तेव्हा संतापलेल्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापकाला धक्काबुक्की करून येथील फर्निचरची नासधूस करून खुर्च्या फेकल्या. त्यानंतर शाखा व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांना कार्यालयातच डांबून ठेवण्यात आले.

सदर आंदोलन युवा स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, विद्यार्थी संघटनेचे शहर अध्यक्ष नीलेश भेंडे, पराग चिमोटे यांच्या नेतृत्वात रवी अडोकार, पराग चिमोटे, सद्दाम हुसेन, अंकुश मेश्राम, राहुल काळे, शुभम उंबरकर, अजय बोबडे, दीपक तायोड आदींची उपस्थिती होती. येथील शाखा व्यवस्थापकाने चांगल्या वागणुकीची लेखी हमी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र यानंतर विनाकारण नागरिकांना त्रास दिल्यास त्या कार्यालयाला कायमचे कुलूप ठोकू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यासंदर्भात बजाज फिन्सरचे कर्मचारी नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळावर दाखल झाले होते. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी कुठलीही तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी दिली.

 

 

 

टॅग्स :agitationआंदोलन