-------
एटीएमवरून पळविले ३९ हजार रुपये
तिवसा : शहरातील एटीएम सेंटरवर पैसे निघत नसल्याने संजय बाळकृष्ण पिसाळ (रा. तळेगाव ठाकूर) यांच्यामागील व्यक्तीने त्यांचे कार्ड हाताळले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने ३८ हजार ९२ रुपये लंपास करण्यात आले. तिवसा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------
मलकापूर येथे युवकाला मारहाण
शेंदूरजनाघाट : नजीकच्या मलकापूर येथे हरिश्चंद्र पैकुजी बोथे (४०) यांना दिनेश दशरथ धुर्वे व एका महिलेने जुन्या वैमनस्यावरून काठीने मारहाण केलीत्ही घटना १६ जुलै रोजी घडली. शेंदूरजनाघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
------------
शेतकऱ्याला दुचाकीची धडक
शिरखेड : सावरखेड ते बोराळा मार्गावर १३ जून रोजी एका शेतकऱ्याला एमएच २७ सीएम ३६३४ क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिली. १६ जुलै रोजी या अपघाताची तक्रार शिरखेड पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------
वरूड येथे महिलेला कारने उडविले
वरूड : दादाजी धुनिवाले मठाजवळ रेल्वे क्रॉसिंगवर २१ मे रोजी एका ३५ वर्षीय महिलेच्या एमएच २७ सीडी ४७७२ क्रमांकाच्या मोपेडला आशिष देशमुख नामक व्यक्तीच्या कारने धडक दिली. या धडकेनंतर त्यांना शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी १६ जुलै रोजी वरूड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
------------
जायन्ट्स चौकातून दुचाकी लंपास
जरूड : वरूड येथील जायन्ट्स चौकातून योगेश घोडसे यांच्या औषधविक्री दुकानापुढे त्यांनी उभी केलेली एमएच २७ सीडी ४८१६ क्रमांकाची मोपेड अज्ञात व्यक्तीने लंपास केली. ८ जुलै रोजी ही घटना घडली. याप्रकरणी त्यांनी १६ जुलै रोजी वरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.