------------------------------------------------------------
लोखंडी सळाखी लंपास
बडनेरा : स्थानिक गांधी विद्यालयामागे असलेल्या जागेतून २६,४०० रुपयांच्या चार बंडल लोखंडी सळाखी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना १७ ते १८ जानेवारी दरम्यान घडली. फिर्यादी राहुल अनिल वगारे (२९, रा. अंजनगाव बारी) यांनी बडनेरा ठाण्यात तक्रार नोंदविली.
---------------------------------------------------------------------------
दुचाकी अपघातात इसम जखमी
अमरावती : नेमानी गोडवूनसमोर ११ जानेवारी रोजी दोन दुचाकी धडकल्या. याप्रकरणी दुचाकी (एमएच २७ झेड २०२४) चा चालक अखिलेश पासवान (रा. कालीमातानगर, नेमाणी गोडावूनच्या मागे) याच्याविरुद्ध सोमवारी गुन्हा नोंदविण्यात आला. नंदकिशोर रामराव अंबूलकर (४७, रा. झिरी मंदिर, बडनेरा) हे अपघातात जखमी झाले. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.
---------------------------------------------------------------------
तोंडाला मास्क न लावल्याबदल गुन्हा
अमरावती: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अद्यापही प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहे. तोंडाला मास्क न लावता फिरताना आढळून आल्याबद्ल बडनेरा पोलिसानी एका इसमाविरुद्ध सोमवारी कारवाई केली. त्याच्याविरुद्ध भादविची कलम १८८ नुसार गुन्हा नोंदविला. ही कारवाई चक्रधर पेट्रोलपंपानजीक करण्यात आली.
गुरूविंद प्रतीपलसिंग नंदा (४७, रा. दस्तुननगर) असे आरोपीचे नाव आहे.
---------------------------------------------------------------
रंगोली लॉन नजीक दारू पकडली
अमरावती: गाडगेनगर पोलिसानी येथील रंगोली लॉननजीक कारवाई करून १३५० रूपयांची अवैध दारू जप्त केली आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. आरोपी शुभम अनिलराव देशपांडे (३८, रा. अनंत विहार कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत.