राज्यस्तरीय स्वच्छता निरीक्षक संवर्गात समावेशन,
वरूड : मेहतर समाजातील दोन युवकांचे सफाई कामगारपदावरून शासनाच्या राज्यस्तरीय स्वच्छता निरीक्षक संवर्गात समावेशन झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
नितीन प्रताप इमले व राहुल रमेश इमले अशी या युवकांची नावे आहेत. त्यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ असा कानमंत्र त्यांनी दिला. प्रास्ताविक व संचालन अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अमर इमले यांनी केले. यावेळी रवि इमले, जितेंद्र करसे, बंटी इमले, अनिल इमले, बबलू इमले, विजेस कनोजे, सुरेश इमले, अनिल मारवे, पंकज इमले, नागेश करसे, मनीष कनोजे, आकाश इमले, भारत करसे, तेजस इमले, नितीन इमले, तुषार कनोजे, ललित इमले, संदीप इमले, अक्षय करसे, उमा इमले, अर्चना इमले, किरण करसे, शिला कनोजे, प्रिती इमले, कीर्ती इमले, सोनल इमले, लक्ष्मी इमले, शीला इमले आदी उपस्थित होते.
===Photopath===
160621\img-20210616-wa0005.jpg
===Caption===
photo