शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
4
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
5
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
6
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
7
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
8
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
9
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
10
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
12
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
13
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
14
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
15
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
16
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
17
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
18
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
19
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
20
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव रोहित देशमुख अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:00 IST

पोलीस सूत्रांनुसार, अकोला येथील युवक काँग्रेसचा कार्यक्रम आटोपून अमरावती व तेथून चांदूर रेल्वेला परतण्यासाठी एमएच २७ डीई ७००० क्रमांकाच्या कारने सर्व मंडळी दर्यापूर मार्गे येत होती. आराळानजीक शनिवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास त्यांच्या कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. त्यामुळे अनियंत्रित झालेली कार रस्त्यावर पालथी झाली. या अपघातात रोहित देशमुख यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले पाचजण जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर/टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू येथील रहिवासी तथा युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव रोहित देशमुख (२७, ह.मु. रुक्मिणीनगर) हे शनिवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास अमरावती ते दर्यापूर मार्गावरील आराळानजीक त्यांच्या कारला अज्ञात ट्रकने धक्का दिल्यानंतर ती कलंडल्याने त्याखाली दबून ठार झाले. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदारपुत्र तथा काँग्रेस पदाधिकारी परीक्षित जगताप व चालकासह पाच जण होते. ते पाचही जण जखमी झाले. पोलीस सूत्रांनुसार, अकोला येथील युवक काँग्रेसचा कार्यक्रम आटोपून अमरावती व तेथून चांदूर रेल्वेला परतण्यासाठी एमएच २७ डीई ७००० क्रमांकाच्या कारने सर्व मंडळी दर्यापूर मार्गे येत होती. आराळानजीक शनिवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास त्यांच्या कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. त्यामुळे अनियंत्रित झालेली कार रस्त्यावर पालथी झाली. या अपघातात रोहित देशमुख यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले पाचजण जखमी झाले. दर्यापूर पोलिसांनी पंचनाम्यानंतर अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

जिल्हा काँग्रेसवर शोककळारोहित देशमुख यांच्या मृत्यूची वार्ता कळताच अमरावती येथील रुक्मिणीनगर स्थित त्यांच्या घरी नातेवाईक, काँग्रेस पदाधिकारी व पुढाऱ्यांनी भेट दिली. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे ते समर्थक होते. रोहित देशमुख यांच्यावर त्यांचे मूळ गाव टाकरखेडा संभू येथे रविवारी दुपारी अंत्यसंस्कार पार पडले. याप्रसंगी पालकमंत्र्यांसह जिल्हाभरातील नेतेमंडळी उपस्थित होती. या घटनेने शहर व जिल्हा काँग्रेसच्या विविध घटकांवर शोककळा पसरली आहे. 

पाच जण जखमी अपघातात मृत रोहित देशमुख यांच्यासोबत कारमध्ये असणारे युवक काँग्रेसचे अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, चांदूर रेल्वेचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे पुत्र परीक्षित जगताप, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, सनी सावंत आणि वाहनचालक आनंद भैसे हे जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत

राजकीय वारसा१९६७ ते १९७७ या काळात अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार रहिलेले के. जी. देशमुख यांचे रोहित देशमुख हे नातू होेत. जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य जयंतराव देशमुख यांचे ते पुतणे होत. त्यांचे वडील अजय देशमुख हे टाकरखेडा संभू ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. त्यांचाच  राजकीय वारसा पुढे नेत रोहित देशमुख हे युवक काँग्रेसच्या महासचिवपदी होते. 

 

टॅग्स :Accidentअपघात