शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वाहनाला ट्रकची धडक; लोकसभा महासचिव रोहित देशमुख ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 12:42 IST

अमरावती युवक काँग्रेसचे लोकसभा महासचिव रोहित देशमुख यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

दर्यापूर/अभिजित देवके

अमरावती युवक काँग्रेसचे लोकसभा महासचिव रोहित देशमुख यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अकोला येथील युवक काँग्रेसचा कार्यक्रम अटोपून अमरावतीला परत येताना दर्यापूर जवळ त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान झालेल्या या अपघातात रोहित यांचा जागेवरच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले पाच जण जखमी आहेत. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे समर्थक मानले जाणाऱ्या रोहित यांच्या अपघाती निधनाने जिल्हा काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. रोहित देशमुख यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

अमरावती-अकोला येथे आयोजित युवक काँग्रेसचा कार्यक्रम आटपून अमरावतीला परत येणाऱ्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वाहनाला दर्यापूर जवळ आराळा येथे ट्रकने धडक दिली. शनिवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात युवक काँग्रेस अमरावती लोकसभा महासचिव रोहित अजय देशमुख (27) हे जागीच ठार झाले. या घटनेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.,        

या अपघातात रोहित देशमुख यांच्यासोबत कारमध्ये असणारे युवक काँग्रेसचे अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, चांदुर रेल्वेचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा मुलगा परीक्षित जगताप, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे आणि वाहनचालक व सनी नावाचा युवक जखमी झाले आहेत. अपघाताची वार्ता कळल्यानंतर दर्यापूर मतदार संघाचे आमदार बळवंतराव वानखडे काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्हा काँग्रेसवर शोककळा 

अपघातात दगवलेला रोहित देशमुख हा माजी खासदार के.जी. देशमुख यांचा नातू असून जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा समर्थक होता. रोहितचे वडील अजय देशमुख हे टाकरखेडा संभुचे माजी सरपंच होते. रोहित देशमुख यांच्या पार्थिवावर आज (रविवारी) सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. सायंकाळी 5 वाजता रोहित देशमुख यांच्या रुख्मिणी नगर येथील निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार आहे. रोहितच्या मृत्यूमुळे देशमुख कुटुंबियांसह शहर आणि जिल्हा काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती