शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अमरावतीच्या युवकाने तिसऱ्यांदा पटकावली आॅस्करची बाहुली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 6:19 PM

आॅस्कर अवॉर्ड हे नावच त्याच्या व्यापकतेची साक्ष देते. ही प्रतिष्ठित बाहुली अमरावती येथील पस्तीशीतील तरुणाने तिस-यांदा पटकावली, असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे.

 - धीरेंद्र चाकोलकरअमरावती - आॅस्कर अवॉर्ड हे नावच त्याच्या व्यापकतेची साक्ष देते. ही प्रतिष्ठित बाहुली अमरावती येथील पस्तीशीतील तरुणाने तिस-यांदा पटकावली, असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे. नीरज वसंतराव इंगळे यांनी ‘स्पायडर मॅन - इन्टू द स्पायडर व्हर्स’ या चित्रपटाच्या व्हीएफएक्सच्या कामगिरीसाठी आॅस्कर अवॉर्ड तिसºयांदा पटकावला आहे. नीरज इंगळे हे  व्हॅन्कुअर (कॅनडा) स्थित सोनी पिक्चर्स इमेजवर्क्स या चित्रपटांना व्हिज्युअल इफेक्ट्सद्वारे सर्वांगसुंदर बनविणाºया कंपनीमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स डिजिटल कंपोझिटर म्हणून अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्यासमवेत असलेल्या ४०० जणांच्या  चमूने गतवर्षी प्रदर्शित झालेल्या ‘स्पायडर मॅन - इन्टू द स्पायडर व्हर्स’ या चित्रपटासाठी व्हिज्युअल इफेक्ट्स निर्माण केले. त्यासाठी त्यांना यंदाचा ‘बेस्ट अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म’ या वर्गवारीत आॅस्कर पुरस्काराचा बहुमान लाभला. नीरज इंगळे यांनी सर्वप्रथम २००८ मध्ये ‘गोल्डन कम्पास’ या चित्रपटासाठी सर्वप्रथम आॅस्कर अवॉर्ड पटकावला. त्यानंतर २०१३ मध्ये आलेल्या ‘लाइफ आॅफ पाय’ या चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी प्रतिष्ठेच्या आॅस्कर अवॉर्डची बाहुली पटकावली. १२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३५ ब्लॉकबस्टर हॉलीवूड चित्रपटांसाठी काम केल्याची नोंद आहे. अमरावती शहरातील राजापेठ परिसरात नीरज इंगळे यांचे मूळ वास्तव्य. त्यांचे वडील वसंतराव इंगळे महावितरणमध्ये कार्यरत होते. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसताना नीरजचा ग्राफिक्सचा छंद जोपासण्यासाठी २००१ मध्ये वडिलांनी त्याला महागडा संगणक घेऊन दिला. त्याच्या साहाय्याने अ‍ॅनिमेशनचे धडे त्याने स्वत: गिरवले आणि मुंबईत या विषयाचा सखोल अभ्यास केला. तत्पूर्वी स्थानिक विद्याभारती महाविद्यालयातून बीसीएस (कम्प्यूटर प्रोग्रामिंग) ही पदवी त्यांनी संपादन केली. बºयाच अडचणींनंतर मुंबई स्थित आर एन्ड एच या कंपनीत त्यांना संधी मिळाली आणि त्यानंतर मागे उलटून पाहिलेच नाही.  प्रेरणादायक प्रवास व्हिज्युअल इफेक्ट्स या क्षेत्रात कुठलंही मार्गदर्शन नसलेल्या अमरावती शहरातून आॅस्करच्या हॅट्ट्रिकपर्यंतचा नीरज इंगळे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता या क्षेत्रात वाटचाल करू इच्छिणाºया युवकांना ‘सोहम कन्सल्टंट्स’च्या माध्यमातून मार्गदर्शन देण्याची त्यांची तयारी आहे.

टॅग्स :Oscarऑस्करAmravatiअमरावती