शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटलेल्या कारचा भीषण अपघात, तरुणी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 05:00 IST

अजनगावसुर्जी येथील गिरी कुटुंबीय एमएच ११ बीके २७५८ क्रमांकाच्या कारने अकोल्यावरून दर्यापूर मार्गे गावी अंजनगाव येथे जात होते. अंजनगाव मार्गावरील ईटकी फाट्यादरम्यान राजेश गिरी यांच्या कारचा टायर फुटल्याने समोर जात असलेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकली. या जबर धडकेत मार लागल्याने अर्पिता  हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर :  दर्यापूरहून गावी अंजनगावसुर्जी येथे जात असताना चारचाकीचा टायर फुटून  झालेल्या अपघातात अनियंत्रित झालेल्या कारमधील १७ वर्षीय तरुणी जागीच ठार झाली. तिचे आई-वडील व कारने धडक दिलेल्या अन्य दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार दुपारी साडेचार वाजता तालुक्यातील इटकी फाट्यानजीक घडली.अर्पिता  राजेश गिरी (१७) असे मृत तरुणीचे नाव आहे. राजेश त्र्यंबक गिरी (४७), रेखा राजेश गिरी (४०, तिघेही रा. अंजनगाव सुर्जी) हे दाम्पत्य तसेच  विशाल गजानन सोळंके  (२८), प्रतीक्षा विशाल सोळंके  (२३, दोघेही रा. घोंडसगाव, ता. अंजनगाव सुर्जी) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. अजनगावसुर्जी येथील गिरी कुटुंबीय एमएच ११ बीके २७५८ क्रमांकाच्या कारने अकोल्यावरून दर्यापूर मार्गे गावी अंजनगाव येथे जात होते. अंजनगाव मार्गावरील ईटकी फाट्यादरम्यान राजेश गिरी यांच्या कारचा टायर फुटल्याने समोर जात असलेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकली. या जबर धडकेत मार लागल्याने अर्पिता  हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तिचे आई-वडील तसेच  दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. घटनेनंतर नागरिकांनी मृत तरुणी  व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात आणले. यानंतर चारही जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले. खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. वृत्त लिहिस्तोवर तेथील पोलीस ठाण्याने पंचनामा सुरू केला होता.

 

टॅग्स :Accidentअपघात