शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कझाकिस्तानमध्ये अडकल्या धामणगावातील तरुणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 5:00 AM

लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नाही. आता तर जेवणासह इतर गैरसोयींनाही सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय विदेश मंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्र्यांसह नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे, ना. आदित्य ठाकरे यांनी दूतावासाकडे प्रयत्न करून सदर विद्यार्थिनींना मायदेशी आणावे, अशी मागणी त्यांच्या पालकांनी केली आहे.

ठळक मुद्देमायदेशी आणा : एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची आर्त विनवणी

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : आम्ही तीन महिन्यांपासून विदेशात अडकलो आहोत. आम्हाला मायदेशी यायचे आहे, अशी विनवणी राज्य शासनाकडे कझाकिस्तान येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या धामणगाव, मंगरुळ दस्तगीर, वर्धा व बुलडाणा येथील विद्यार्थिनींनी केली आहे.लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नाही. आता तर जेवणासह इतर गैरसोयींनाही सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय विदेश मंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्र्यांसह नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे, ना. आदित्य ठाकरे यांनी दूतावासाकडे प्रयत्न करून सदर विद्यार्थिनींना मायदेशी आणावे, अशी मागणी त्यांच्या पालकांनी केली आहे.कझाकिस्तानच्या कारागंदा मेडिकल युनिव्हार्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे धामणगाव, मंगरुळ दस्तगीर, वर्धा, बुलढाणा तसेच राज्यभरातील अनेक विद्यार्थी लॉकडाऊनमुळे वसतिगृह, फ्लॅटमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये धामणगाव येथील अदिती काळे, मंगरूळ दस्तगीर येथील किरण टेम्पे, बुलडाणा येथील मंजिरी महंत व वर्धा येथील रिया कांबळे, गुंजन बोकडे यांचा समावेश आहे. त्याच ठिकाणी थांबण्याची सूचना करण्यात आली असली तरी या विद्यार्थ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. पालकांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी लोकप्रतिनिधींसह शासनाने प्रयत्न करावेत, त्यांना एअरलिफ्ट करून परत आणावे, अशी मागणी अदिती काळेचे वडील डॉ. राजेश काळे, सत्यशील टेंम्पे यांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान विदेशमंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या मुलींना मायदेशी आणण्याचे प्रयत्न करण्याची मागणी केली.दोन महिन्यांपासून प्रतीक्षाकझाकिस्तान येथून भारतात परतण्यासाठी अदिती काळे या विद्यार्थिनीचे २३ मार्चचे तिकीट होते. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाल्याने ती अडकली. दोन महिन्यांपासून ती घरी परतण्याच्या आशेवर प्रत्येक दिवस मोजून काढत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या