लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : नकोसे मूल काही मातांकडून फेकून दिले जाते. असे केल्यास न्यायालय जन्मदात्यांना कठोर शिक्षा देते. अशा प्रकरणामध्ये अनैतिक संबंधातून जन्मास आलेले शिशू फेकल्यास १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाद्वारे सुनावली जाते, तर काही प्रकरणांत तिसरी व चौथी मुलगीच झाल्यास अवसानघातकी निर्णय घेतला जातो.
प्रेम प्रकरणातून लग्न न होताच बाळ जन्माला आल्यास अशा बाळाला कुठे तरी फेकून देऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला जातो. जन्माला घातलेले बाळ फेकताना मातेलाही अश्रू अनावर झालेले असतात. प्रेमाच्या नावाखाली अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची जबाबदारी स्वीकारण्यास संबंधित व्यक्ती तयार होत नाही. त्यावेळी माता निर्दयी बनते. मात्र, हे चुकीचे आहे. संबंधित मातेवर कारवाई होते. बाळाची जबाबदारी स्वीकारण्यास त्याचा जन्मदाता बाप तयार नसल्यास याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात करता येते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा असा कुठलाही प्रकार उघड झाला नाही.
अपत्यासाठी उपवास, नवस अन् गंडेदोरे काही जणांना मूल होतं; पण लगेच त्या मुलाचा मृत्यू होतो, काहींना संतती सुख प्राप्त होत नाही. असे अनेक जण अनेक व्रत, उपास तापास करतात. नवसदेखील बोलतात. त्यासाठी कठोर व्रतदेखील केले जाते.
इर्विनमधील स्वच्छतागृहात अर्भक जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजेच इर्विनमधील कॅज्युअल्टी विभागातील शौचालयाच्या सीटमध्ये यंदाच्या २६ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास एक नवजात मृत अर्भक आढळल्याने खळबळ उडाली होती. शौचालयाच्या सीटमध्ये मृत आढळलेले ते अर्भक पुरुषलिगी होते.
अपत्यप्राप्तीसाठी महागडे उपचारअपत्यप्राप्तीसाठी केले जाणारे वैद्यकीय उपचार फार महागडे आहेत. एवढा खर्च करूनही गर्भारपण राहील की नाही, एकवेळ प्रसूती झाली तरी झालेले बाळ जगेल की कसे, हे कुणालाही शतप्रतिशत सांगणे शक्य नाही. सरोगसी असो वा अन्य पर्याय सारेच महागडे आहेत.
स्त्री अर्भकाचे प्रमाण अधिक गर्भलिंगनिदान आणि स्त्री- भ्रूणहत्येपाठोपाठ नवजात अर्भकांना फेकण्याचे प्रमाणही राज्यात वाढत चालले आहे. उच्चभ्रू वर्गातही हे प्रकार सर्रास घडत आहेत. मुलगाच हवा या अट्टाहासापोटी नवजात बालिकेला कचराकुंडी, गटार, नाल्यात फेकून दिले जात आहे.
दहा महिन्यांत एक अर्भक सापडले गेल्या दहा महिन्यांत शहर आयुक्तालयात नवजात अर्भक फेकून दिल्याबाबत एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती शहर वा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातदेखील तसे प्रकार उघड झालेले नाहीत.
अनैतिक संबंध, अत्याचारप्रकरणी शेकडो गुन्हे शहर आयुक्तालयात गेल्या ११ महिन्यांत बलात्काराचे एकूण ९६ गुन्हे दाखल आहेत, तर ग्रामीण भागात ११७ गुन्हे दाखल आहेत.
प्रेमप्रकरणे कारणीभूत बदनामीची भीती तारुण्यात झालेल्या चुकांमुळे जन्मलेल्या बालकांना वाऱ्यावर सोडण्याचे प्रमाण शहरी व ग्रामीण दोन्ही भागात आहे. त्याला प्रेमप्रकरणे व बदनामीची भीतीदेखील कारणीभूत आहे
...तर होतो गुन्हा दाखल "नवजात जिवंत अर्भकाला फेकून दिल्यास, फेकून दिल्यानंतर दगावल्यास किंवा मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावलेली आढळल्यासदेखील गुन्हा नोंदविला जातो. यात शिक्षेची तरतूद आहे."
- कल्पना बारवकर, पोलिस उपायुक्त