लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घराच्या दुसऱ्या मजल्यावर पतंग उडवित असताना घराजवळूनच गेलेल्या उच्चदाब वाहिनीच्या तारेला पतंग व मांजा अडकला. तो युवकाने लोखंडी पाइपने काढण्याचा प्रयत्न केला असता, लोखंडी पाईपमध्ये वीजप्रवाहाचा संचार होऊन तो भाजला गेला. गंभीर जखमी झालेल्या मुलाला वडिलांनी नागरिकांच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. ही घटना नवाथेनगरात शनिवारी सायंकाळी ७ वाजता दरम्यान घडली.प्राप्त महितीनुसार, धीरज पिहूलकर (२५, रा. नवाथेनगर) असे गंभीररीत्या भाजलेल्या युवकाचे नाव आहे. तो घराच्या दुसºया मजल्यावर पतंग उडवित होता. जिवंत विद्युत तारेत पतंग अडकल्याने त्याने घरातून लोखंडी पाइप आणला आणि पतंग काढण्याचा प्रयत्न केला. त्या तारेला पाईपचा स्पर्श होताच युवक भाजल्या गेला. त्याच्या हाताला व छातीला इजा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर शॉर्ट सर्कीट होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला.धीरजचे वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. ही घटना कर्णोपकर्णी माहिती होताच नागरिकांची गर्दी त्याच्या घराभोवती झाली. काही वेळानंतर महावितरणचे अधिकारीसुद्धा घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लिहिस्तोवर राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली नव्हती.नायलॉन मांजावरबंदी का नाही?नायलॉन मांजाची विक्री व वापरावर बंदी आहे. मात्र, संचारबंदीत घरी असलेली मुले नायलॉन मांजा लावून पतंग उडवित आहेत. या मांजाने अनेकदा जिवावर बेतले आहे. पक्ष्यांचा मृत्यू झाला, पंख कापले गेले. यामुळे नायलॉन मांजावरील बंदीबाबत काटेकोर व गंभीर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून वेळोवेळी होते. संचारबंदीच्या काळात पतंग विक्रीसह उडविण्यावर बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अडकलेली पतंग काढताना वीजप्रवाहाने भाजला युवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST
युवकाने लोखंडी पाइपने काढण्याचा प्रयत्न केला असता, लोखंडी पाईपमध्ये वीजप्रवाहाचा संचार होऊन तो भाजला गेला. गंभीर जखमी झालेल्या मुलाला वडिलांनी नागरिकांच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. ही घटना नवाथेनगरात शनिवारी सायंकाळी ७ वाजता दरम्यान घडली.
अडकलेली पतंग काढताना वीजप्रवाहाने भाजला युवक
ठळक मुद्देनवाथेनगरातील घटना । इर्विनमध्ये उपचार