शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मेमू ट्रेनच्या डब्यात तरुणाने घेतली फाशी; चिट्ठीतून समोर आले कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 17:04 IST

बडनेरा ते नरखेड मेमू ट्रेन रात्री बडनेरा रेल्वे स्थानकावर मुक्कामी थांबते. याच ट्रेनच्या एका डब्यात योगेश स्वतःच्या शर्टाने साखळीला लटकून गळफास घेतलेल्या अवस्थेत रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना सापडला.

ठळक मुद्देबडनेरा रेल्वे स्थानकावरील घटना

अमरावती : बडनेरा येथील रेल्वे स्थानकावर रात्री मुक्कामी थांबणाऱ्या मेमू ट्रेनच्या डब्यामध्ये २३ वर्षीय तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास समोर आली. या तरुणाजवळ तोडक्या-मोडक्या इंग्रजी भाषेत लिहिलेली चिठ्ठी रेल्वे पोलिसांना सापडली.

योगेश घनश्याम कोरताम (२३, रा. कंपासपुरा, बडनेरा) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बडनेरा ते नरखेड मेमू ट्रेन रात्री बडनेरा रेल्वे स्थानकावर मुक्कामी थांबते. याच ट्रेनच्या एका डब्यात योगेश स्वतःच्या शर्टाने साखळीला लटकून गळफास घेतलेल्या अवस्थेत रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना सापडला. त्याच्याकडे इंग्रजी भाषेत लिहिलेली चिठ्ठी सापडली.

स्वमर्जीने आत्महत्या करत असल्याचे त्यात लिहिले आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. काही लोकांचे पैसे देणे असल्याचाही उल्लेख या चिठ्ठीत आहे. रेल्वे पोलिसांकडील सीसीटीव्ही फुटेजमध्ये योगेश रात्री साडेदहाच्या सुमारास ब्रीजवर असल्याचे दिसून आले.

रेल्वे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलीस उपनिरीक्षक राजेश वरठे अधिक तपास करत आहेत. दोन वर्षांपूर्वी योगेशच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती.

टॅग्स :Deathमृत्यूBadneraबडनेराAmravatiअमरावती