शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून तरुणीला कॉलेजात मारहाण, विनयभंग

By प्रदीप भाकरे | Updated: August 24, 2023 13:00 IST

दर्यापुरातील भयानक प्रकार, तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल

अमरावती : एक अल्पवयीन विद्यार्थीनी काॅलेजच्या कॅंटिनसमोर उभी असताना एका माथेफिरूने तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दर्यापूर येथील एका कनिष्ट महाविद्यालयासमोर २२ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० ते २ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पिडिताच्या आईच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी आरोपी श्रेयस तायडे (१९,रा. आठवडी बाजार, दर्यापूर) याच्याविरूद्ध २३ ऑगस्ट रोजी विनयभंग, मारहाण व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला. तथा त्याला तातडीने अटक करण्यात आली.

यातील अल्पवयीन मुलीचे आरोपी श्रेयससोबत एक वर्षापूर्वी प्रेम संबंध होते. ते तिच्या कुटुंबियांना माहिती झाल्याने तिच्या आईवडिलांना तिच्यासह आरोपीला देखील समजावून सांगितले. तेव्हापासून ती मुलगी आरोपीसोबत बोलत नव्हती. तरी देखील आरोपीतिचा वाईट उद्देशाने पाठलाग करत होता. तिला त्रास देत होता. त्यामुळे ती हतबल झाली होती. ती त्याला टाळण्यासाठी नेहमीच रस्ता बदलायची.

दरम्यान २२ ऑगस्ट रोजी ती कॉलेजला गेली असता दुपारी दिड ते दोनच्या सुमारास ती कॉलेज कॅंटिनसमोर उभी होती. तेव्हा आरोपी श्रेयस हा तेथे आला. कुणाचिही तमा न बाळगता तिला त्याने लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्या माराने ती खाली कोसळली. आरडाओरड झाल्याने तिचे शिक्षक तेथे बोलावले. शिक्षकांनीच तिला दवाखान्यात नेले. तेथे उपचार घेत असताना दर्यापूर पोलिसांनी रुग्णालय गाठून तिचे बयान नोंदविले. तर दुसरीकडे दर्यापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावती