शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

युवा शेतकऱ्याने जपली परंपरा, वऱ्हाडी बैलगाडीतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 01:09 IST

तालुका तसा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि परंपरेचा वारसा जपणारा. मंगरूळ दस्तगीर येथील युवा शेतकऱ्याने ती जपत आपल्याकडील वऱ्हाडी १५ बैलगाड्यांतून जवळपास १० किमी विवाहस्थळी नेले आणि नवरीलाही सजविलेल्या दमणीतून घरी आणले.

ठळक मुद्देदहा किलोमीटरचा केला प्रवास

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : तालुका तसा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि परंपरेचा वारसा जपणारा. मंगरूळ दस्तगीर येथील युवा शेतकऱ्यांने ती जपत आपल्याकडील वऱ्हाडी १५ बैलगाड्यांतून जवळपास १० किमी विवाहस्थळी नेले आणि नवरीलाही सजविलेल्या दमणीतून घरी आणले.तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील हाडाचे शेतकरी असलेले हरिभाऊ इंगोले यांचा मोठा मुलगा रूपेश यांचा विवाह बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथील नानाजी वानखडे यांच्या उच्चशिक्षित शीतल या मुलीशी बुधवारी नायगाव येथे लखाजी महाराज देवस्थान सभागृहात पार पडला. घरी सर्व संपन्नता असतानाही शेतकऱ्याचा मुलगा असल्याने गावातील बैलबंडीने वऱ्हाडी लग्नमंडपी नेण्याचे त्याने ठरविले. नवरदेवासह वऱ्हाडी विवाह सोहळ्यासाठी बैलगाडीने गेल्याने या विषयाची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात रंगत आहे.जवळपास १५ बैलगाड्यांनी वऱ्हाडी निघाले. पारंपरिक पायजना व शर्ट परिधान केलेल्या नवरदेवाकरिता सजविलेल्या दमणीचा धुरकरी हा टाय-कोटमध्ये ‘अप टू डेट’ होता. या दमणीला उंचपाठी पंढरपुरी बैलजोडी जुंपली होती. पाठीवर चमकदार झूल आणि रंगवलेल्या शिंगांवर देवांच्या तसबिरी असलेले वाशिंड होते. गावात अनेक वर्षांनतर पहिल्यांदाच बैलजोडीने नवरदेव निघत असल्याने आबालवृद्ध हरखले होते.मंगरूळ दस्तगीर ते नायगाव असा प्रवास करून लग्नकार्य उरकल्यानंतर नवरदेव-नवरी पुन्हा याच बैलगाड्यांनी घरी परतले.शेतकऱ्यांना कितीही जिवावर येत असले तरी बैलजोडीचे महत्त्व अबाधित आहे. आजच्या तरुणांना हे दाखविण्यासाठी तसेच आपल्या परंपरा जतन करण्यासाठी हे पाऊल उचलले.- रूपेश इंगोले, नवरदेव

टॅग्स :marriageलग्न