अमरावती : एका युवकाने मुलीचे दुचाकी थांबविली आणि तू माझे जीवन बरबाद केले, तुला आत खतम करून टाकतो, अशी धमकी देऊन कारमधूनच युवतीच्या हातावर ब्लेडने मारून तिला जखमी केल्याची धक्कादायक गाडगेबाबा निर्वाणभूमीजवळ वलगाव येथे सोमवारी घडली.
मोहन साहेबराव तायडे (३०), गजानन साहेबराव तायडे (२४, दोन्ही रा. अंबाडा, जि. बुलडाणा) तसेच अज्ञात दोन इसम यांच्याविरुद्ध याप्रकरणी वलगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ३४१, ५०६ (ब), ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. फिर्यादी मुलगी ही तिच्या दुचाकीने मैत्रिणीला घेऊन अमरावती येथे जात होती. सदर आरोपीने तिला रस्त्यात अडवून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ब्लेडने वार करून जखमी केले. त्यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले.